Maharashtra HSC Results 2023 Declared 96.9 Percent Student Pass In Science Streme In Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra HSC Results 2023 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2023 Declared) झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला असून आय.टी.आयचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसाय शाखेचा निकाल 80 टक्क्यांच्य़ावर लागला असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

यात विज्ञान शाखेचा निकाल 96.09 टक्के, कला शाखेचा निकाल 84.05टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 90.42 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम 89.25 टक्के तर आयटीआय शाखेचा निकाल 90.84 टक्के लागला आहे.  यंदाच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागातील 14,16,371 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान  शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चार माध्यमातून आणि इतर शाखांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या सहा भाषेतून परीक्षा घेण्यात आली.
 

मागील वर्षापेक्षा दोन टक्क्यांनी घसरला…

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी राज्याचा निकाल हा 94.22 टक्के लागला होता. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा निकाल 2.97 टक्क्यांनी घसरला आहे.  राज्यातील नऊ विभागांपैकी कोकण विभागाचा हा सर्वाधिक म्हणजे 96.01 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल हा सर्वात कमी म्हणजे 88.13 टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 93.73 टक्के तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 89.14 टक्के आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी अधिक आहे. यंदा 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी इयत्तेच्या 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.25 टक्के लागला असून  मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे.

कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल?

पुणे : 93.34 टक्के 
नागपूर : 90.35 टक्के 
औरंगाबाद : 91.85 टक्के 
मुंबई : 88.13 टक्के  
कोल्हापूर : 93.28 टक्के 
अमरावती : 92.75 टक्के 
नाशिक : 91.66 टक्के 
लातूर : 90.37 टक्के 
कोकण : 96.25 टक्के 

 

संबंधित बातमी- 

HSC Result 2022 : राज्याचा निकाल 91.25 टक्के, 17 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; जाणून घ्या, यंदाच्या बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

[ad_2]

Related posts