[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच नाशिक पेठ मार्गावर देखील वाढती वाहतूक अपघातांना निमंत्रण देत असते. त्यामुळे सातत्याने या मार्गावर अपघात होत आहे. या महामार्गावर शुक्रवारी करंजाळीजवळ बस आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांना नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांतील अपघाताच्या घटना बघता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहनांचा वेग सुसाट असल्याचे दिसते. तसेच नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या महामार्गावर शुक्रवारी करंजाळीजवळ (Karanjali) बस आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले होते, त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. हे चौघेही गुजरातहून नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) परिसरात फिरण्यासाठी आले होते. घरी परतत असताना पेठ जवळील करंजाळी गावाजवळ एसटीची समोरासमोर धडक झाली. यात चौघांचाही मृत्यू झाला.
पेठ-धरमपूर (Peth Dharampur Highway) राष्ट्रीय महामार्ग क्र. 848 वर करंजाळी जवळील वळणावर हा अपघात (Accident) झाला. एसटी महामंडळाची ही बस पेठ आगाराची आहे. ही बस पेठ येथून पुण्याला जात होती. तर सनी कार ही नाशिकहून गुजरातकडे जात होती. करंजाळी गावाजवळ आले असता एका वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात डिव्हायडर ओलांडून कार दुसऱ्या लेनमधील एसटी बसला (ST Bus And car accident) धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. यात पाठीमागील बाजूस असलेल्या दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर झाले होते, त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सद्वारे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किसन छगनभाई वाघासिया, रवीभाई प्रवीणभाई दोबारिया, जयदीप लभभाई गोयानी, जयनीश मुकेशभाई सुतारिया अशी मयत झालेल्या नावे आहेत.
नेमका अपघात कसा झाला?
गुजरात राज्यातील बलसाड येथील चौघे मित्र हे कारने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला फिरायला गेले होते. त्यानंतर ते पुन्हा बलसाडकडे पेठ धर्मपुरी मार्गाने निघाले होते. मात्र वाटेत करंजाळी गावाजवळ एका वळणावर ओव्हरटेक करत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार थेट दुसऱ्या लेनमधून जात असलेल्या एसटी बसला धडकली. समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या अपघातात बसमधील काही प्रवाशीही किरकोळ जखमी झाले.
इतर महत्वाची बातमी :
Nashik News : रात्रीची वेळ, ओव्हर स्पिडिंग जीवावर बेतणारं! नाशिक जिल्ह्यात सात महिन्यात 914 अपघात, 578 जणांचा मृत्यू
[ad_2]