[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पालघर: पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वडवली या गावात गोवंश जातीची पाच जनावरं क्रूरपणे डांबून ठेवण्यात आली असल्याची खबर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलिसांना मिळाली, ही माहिती मिळताच पोलिसांनी गो तस्करांवर धाड टाकली. यानंतर गो तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढवला आणि यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (8 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकाराने वाडा तालुक्यातील वडवली गावचं वातावरण तणावग्रस्त बनलं आहे.
गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस शिपाई सचिन भोये असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांच्या पाठीवर आणि गुप्तांगावर जखम झाली असून त्यांच्यावर वाडा रुग्णालयात उपचार करण्यात आली आणि नंतर त्यांना घरी पोहोचवण्यात आलं.
तीन आरोपींचा पोलिसांवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील वडवली (उसर कॅम्प) या गावात गोवंश जातीची पाच जनावरं अतिशय क्रुरपणे डांबून ठेवण्यात आली असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलिसांना मिळाली, या प्रकाराची माहिती मिळताच शुक्रवारी (8 सप्टेंबर) पहाटे 3.30 च्या सुमारास धाड टाकली. यानंतर आरोपी फौजान लोनबाल, रुबिना लोनबाल आणि तेथील काम करणारा कामगार साईनाथ यांनी पोलिसांवर हल्ला चढवला आणी या हल्ल्यात सचिन भोये हे पोलीस कर्मचारी जखमी झाले.
एक आरोपी अटकेत, इतर फरार
सदर प्रकरणी रुबिना लोनबाल हिला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार झाले आहेत आणि पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या टाकलेल्या धाडीत पोलिसांना गोमांसही मोठ्या प्रमाणात आढळून आलं असून ते दफन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे करत आहेत.
इगतपुरीतही गोमांस तस्करीच्या संशयातून राडा
सिन्नर-घोटी मार्गावर गंभीरवाडी जवळ गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून दोघांना मारहाण केल्याचा प्रकार 25 जून रोजी समोर आला. सिन्नर-घोटी मार्गावर गंभीरवाडी जवळ दोन जणांना गोमांस घेऊन जाण्याच्या संशयातून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांनाही जवळच्या एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असताना एकाचा मृत्यू झाला.
सिन्नर-घोटी महामार्गावरील (Sinnar-Ghoti Highway) गंभीरवाडी जवळ गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून दोन व्यक्तींना अज्ञात दहा ते पंधरा जणांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. स्थानिकांनी त्यांना जवळच असलेल्या धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात (SMBT Hospital) पुढील उपचारासाठी दाखल केलं होतं, यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी घोटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा:
भीषण वास्तव! मराठवाड्यात रोज 3 शेतकरी संपवतायत जीवन, शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक; कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक संख्या
[ad_2]