[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जी – 20 परिषदेचा (G-20 Summit) रविवार (10 सप्टेंबर) रोजी समारोप करण्यात आला. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली. या बैठकीनंतर मॅक्रॉन यांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक देखील केलं. या बैठकीसंदर्भात ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत दुपारच्या जेवणावेळी अत्यंत सार्थक बैठक पार पडली.’ आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली तर या बैठकी वेळी भारत आणि फ्रान्स प्रगतीचे नवीन विक्रम रचतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
A very productive lunch meeting with President @EmmanuelMacron. We discussed a series of topics and look forward to ensuring India-France relations scale new heights of progress. pic.twitter.com/JDugC3995N
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2023
फ्रान्सने काय म्हटलं?
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी जी-20 परिषदेमध्ये देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेची तत्त्वे राखण्याबद्दल भाष्य केलं. आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सुधारणांना देखील समर्थन देत आहोत. द्विपक्षीय बैठकीवर भाष्य करताना मॅक्रॉन यांनी म्हटलं की, ‘फ्रान्स भारतासोबत संरक्षण सहकार्य आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करेल.’ त्यांनी भारताने केलेल्या जी – 20 परिषदेच्या आयोजनाचे देखील कौतुक केले आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोटो देखील मॅक्रॉन यांनी शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी वसुधैव कुटुम्बकम् असं कॅप्शन देखील दिलं आहे.
वसुधैव कुटुम्बकम्
The world is one family.
Le monde est une seule famille. pic.twitter.com/53Fjkmyjh6
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) September 10, 2023
भारत आणि पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाले मॅक्रॉन?
मॅक्रॉन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेसोबत बाचतीत करताना म्हटलं की, भारताता घालवलेल्या मी पंतप्रधान मोदी आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. जी-20 शिखर परिषदेने एकतेचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत केलेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली असल्याची माहिती देण्यात आलीये.
दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या द्विपक्षीय बैठकीचा रविवार (10 सप्टेंबर) रोजी समारोप झाला. या परिषदेसाठी अनेक प्रमुख देशांचे नेते हे भारतात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय बैठक देखील केली.
हेही वाचा :
G-20 Summit : जी-20 परिषदेचे सूप वाजलं; ‘या’ खास संदेशासह पंतप्रधान मोदींनी केला समारोप, पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणार परिषद
[ad_2]