[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुम्ही असा विचार करत असाल की कोरोना व्हायरसचा उद्रेक आता संपला आहे, तर तुम्ही चुकीचा विचार कातरत आहात. अर्थात त्याची तीव्रता कमी झाली आहे पण हा विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही आणि होणार नाही. अनेक अभ्यासांमध्ये शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. वास्तविक Corona Virus हा त्याचे स्वरूप बदलून सारखा सक्रीय होतो आहे. या वेळी तो BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे, ज्याला Pirola असेही म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने कोरोनाचा नवीन प्रकार असणाऱ्या, BA.2.86 ची पुष्टी केली आहे.फारशी प्रकरणे आढळून आली नसली तरी या महिन्यात 19 ऑगस्टला 7 नवीन केसेस समोर आल्यानंतर दोन्ही संस्थांनी त्यावर देखरेख करत असल्याचे सांगितले आहे. नेचरवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अमेरिका, डेन्मार्क, इस्रायल आणि यूके यासह अनेक खंडांमधील अनेक देशांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. चला जाणून घेऊया कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि तो धोकादायक आहे का? (फोटो सौजन्य :- iStock)
[ad_2]