Apple Watch Series 9 And Ultra 2 Features Improved Heart Rate Check The Price Specifications And Availability In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Apple Smartawatch Series 9 and Ultra 2 : दोन दिवसांनंतर आयफोनची बहुप्रतिक्षीत सिरिज लाँच होणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल  (iPhone 15) बाजारात  आणणार आहे. फक्त Iphone 15 बाजारात न आणता कंपनी स्मार्टवाॅचदेखील  लाँच करणार आहे. यामध्ये ॲपल वॉच 9 आणि अॅपल वाॅच अल्ट्रा 2  असे दोन वाॅच कंपनी लाँच करेल. आगामी स्मार्टवाॅचमध्ये कंपनीने अनेक भन्नाट बदल केले आहेत. कंपनीने माहिती दिली की, स्मार्टवाॅचच्या मागील सिरिजमध्ये कंपनीने फक्त एकच प्रोसेसर दिला होता. मात्र आता कंपनी आगामी माॅडेलमध्ये चांगला सेन्सर आणि आणखीन उत्कृष्ट दर्जाचे इंटरनल कंपोनंट देणार आहे. 

Apple Watch मध्ये Heart Sensor हे स्मार्टवाॅचचे मुख्य फिचर आहे. जे वापरकर्त्यांच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेते. आगामी स्मार्टवाॅचमध्ये वापरलेला सेन्सर अधिक अचूक आणि विश्वासार्ह असणार आहे. जे लोकांना अगदी अचूकपणे Heart Rate , रक्तातील ऑक्सिजन पातळी आणि रोजच्या वर्कआऊटबद्दल  माहिती देईल. 

कशी असेल डिझाईन

Apple Smartwatch मध्ये U2 चिप आणि नवीन अल्ट्रा-वाइडबँड चिप वापरण्यात आलेली आहे. ज्यामुळे हे वाॅच अधिक अचूकपणे काम करेल. अल्ट्रा-वाइडबँड टेक्नाॅलाॅजीमुळे वापरकर्ते त्यांच्या आजूबाजूला असलेल्या Apple Devices चा शोध घेऊ शकतात. नवीन Apple Smartwatch च्या डिझाईनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अॅपल वाॅच अल्ट्रा 2 मध्ये तुम्हाला एक नवीन ऑल-ब्लॅक कलर पर्याय पाहायला मिळेल. 

असणार दमदार फिचर्स

Apple Watch 9 Series हे प्रामुख्याने 2 आकारात उपलब्ध असेल, एक 41 mm आणि दुसरा 45 mm आहे. तर Apple Watch Ultra 2 49mm मध्ये उपलब्ध असेल. नवीन मॉडेल्सच्या किंमतीविषयी कंपनीने कोणतीच माहिती दिली नाहीये. या नव्या स्मार्टवाॅचबद्दल इतर माहिती कंपनी कॅलिफोर्निया येथे होणाऱ्या Wanderlust कार्यक्रमात देऊ शकते. तुम्ही हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा यूट्यूब चॅनेलद्वारे पाहू शकाल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. 

यूएस, युरोप, यूके आणि भारतात Iphone 15 एकाच वेळी होणार लॉंच

यावेळी आयफोन संदर्भात देखील कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. यूएस, युरोप, यूके आणि इतर बाजारपेठेतील लोकांसोबत भारतीयांनाही त्याच वेळी Iphone उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आधी Iphone करता वाट पाहावी लागत होती आता मात्र तुम्हाला लगेच Iphone उपलब्ध होणार आहे. भारतात देखील इतर देशांप्रमाणेच iPhone 15 अनबॉक्स केला जाणार असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

Gmail : आता मेसेजऐवजी ‘या’ हटके फीचरद्वारे मेलला करता येणार रिप्लाय, काय आहे नवीन फीचर?

[ad_2]

Related posts