Nashik Latest News Rains Stops In Nashik, Discharge From Gangapur Dam Stopped, Godavari Flood Also Receded Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात दोन दिवस धो धो बरसल्यानंतर काल दुपारपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरीला आलेला पूरही ओसरला असून नाशिकसह गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून विसर्गही घटविण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककरांना दोनच दिवस गोदावरी खळाळून वाहताना पाहायला मिळाली. कालपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली असून अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. 

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने (Nashik rain) सुरवात केली. त्यानंतर जवळपास 48 तास नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, गोदावरीला हंगामातील (Godawari) पहिला पूर आला. या पावसाने जिल्हावासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र हा आनंद काही तासांपुरताच ठरला. कारण दोन दिवस मुसळधार हजेरी लावल्यानंतर शनिवारी दुपारपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूरसह अन्य धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला आलेला पुरही ओसरला आहे. गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. 

दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले होते. गंगापूर धरण 95 टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला होता. गोदावरी नदीकाठी पूरसदृश स्थिती होती. पावसाचा जोर कमी झाला असल्याने गंगापूर धरणातून (Gangapur Dam) विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 9 हजार 88 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. शनिवारी सकाळी 6 वाजता तो कमी करून 5 हजार 432 करण्यात आला. मात्र त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग हळूहळू थेट बंद करण्यात आल्याने गोदावरी पूर परिस्थिती पूर्वपदावर आली. नाशिक शहरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पहाटेपासून अचानक पावसाचा जोर कमी झाला. गंगापूर धरण परिसरातही पावसाने चांगलीच उघडीप दिली. यामुळे धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने नदीची पूरस्थिती घटल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

गोदाकाठावरील परिस्थिती पूर्वपदावर 

दोन दिवस नाशिक शहरासह सर्वदूर झालेल्या पावसाने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे जोरदार पाऊस झाला. शनिवारी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ होता. यामुळे शहरासह जिल्ह्यातही फारसा जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी शुक्रवारी वेगाने विविध धरणांमधून वाढविलेला विसर्ग शनिवारी सकाळपासून तितक्याच वेगाने पाटबंधारे खात्याकडून कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होताच गोदावरीची पूरस्थितीही हटली. एकूणच गोदावरीचा पूर रात्रीपर्यंत पूर्णतः ओसरला होता. शनिवारी दुपारनंतर गोदाकाठावरील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. शुक्रवारच्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था झाली. भुयारी गटारींचे चेंबरही ठिकठिकाणी तुडुंब भरुन वाहत होते. शनिवारीही काही भागात चेंबरमधून पाणी ओथंबून वाहताना नजरेस पडले.

 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य

 

[ad_2]

Related posts