Osmanabad Maharashtra Support To Manoj Jarange Protest For Maratha Reservation Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उस्मानाबाद : कसबे तडावळ्यात सध्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण सुरु आहे. पण या उपोषणावेळी एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. कसबे तडवळे येथील शेतकरी पुत्र असलेले गणेश निवृत्ती करंजकर हा रविवार (10 सप्टेंबर) रोजी उपोषणासाठी बसला होता. पंरतु आपल्याशिवाय आपली गाय धार काढू देत नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने थेट गाईलाच आंदोलनस्थळी आनलं आणि तिची धार काढली. सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक पुकारण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादमधील (Osmanabad) तडावळेमध्ये देखील आंदोलक करण्यात येत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी पेटलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात गावागावात पोहोचली आहे. जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी सकाळी नऊ वाजता कसबे तडवळे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर  छत्रपती शाहू महाराज चौकात उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  उपसरपंच प्रताप उर्फ बंडू करंजकर आणि गणेश निवृत्ती करंजकर हे दोघेजण सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणास बसलेत. 

आंदोलनासाठी बसलेल्या दोन करंजकर बंधू पैकी गणेश करंजकर यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे शेतात एक जर्सी गाय देखील आहे. सकाळी आंदोलनाला बसत असताना आपली गाय आपल्या शिवाय कोणालाही धार काढू देत नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. पंरतु सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर मात्र त्यांची खूप पंचायत झाल्याचं पाहायला मिळालं. शेवटी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास दोन तरुणांनी शेतात जाऊन गाईला उपोषण स्थळी आणले. तिथेची तिची धार काढण्यात आली. तर हे आंदोलन संपेपर्यंत ही गाय आंदोलन स्थळीच बांधण्यात येईल, असं करंजकर यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. 

आमरण उपोषणातून उठता येणार नसल्यानं तिला आंदोलनस्थळीचं चारा पाणी करण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तर माझ्यासाठी मराठा आरक्षण हे जास्त महत्त्वाचं असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. ज्या गोष्टी आमच्या पिढीला मिळाल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी हे आरक्षण महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. 

हेही वाचा : 

Manoj Jarange : यापुढे रस्ता रोको, चक्का जाम आंदोलन करू नका; मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन

[ad_2]

Related posts