Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 26th May 2024 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकेवर आज सुनावणी 

 नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज (26 मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि पी.एस. नरसिम्हा यांच्या सुट्टीतील खंडपीठासमोर होईल. सी.आर. जयसुकिन नावाच्या वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या या याचिकेमध्ये कलम 85 नुसार राष्ट्रपती या संसदेचं सत्र बोलवतात. तसेच 87 नुसार त्याचं संसदेत अभिभाषण देखील होतं. ज्यामध्ये राष्ट्रपती दोन्ही सदनांना संबोधित करतात. सेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं. (वाचा सविस्तर)

उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या काळात 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर

उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) योगी सरकारच्या काळात 2017 पासून आत्तापर्यंत 186 गुन्हेगारांचा एन्काऊंटर म्हणजे दर 15 दिवसाला एक गुंड पोलीस चकमकीत ठार होत असल्याची माहिती समोर आली आहे.  तर पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या गुन्हेगारांची संख्या 5046 इतकी आहे. (वाचा सविस्तर)

नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, नाण्याची वैशिष्ट्ये काय? 

नवीन संसद भवनाचे  उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी (25 मे) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ 75 रुपयांचं नाणं (Rs 75 Coin) जारी केलं जाणार असल्याची घोषणा केली (वाचा सविस्तर)

news reels Reels

पाकिस्तान-चीनला आता समुद्रातही धडकी भरणार 

 भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला असून मिग 29 के (MiG 29K) या विमानाने रात्रीच्या अंधारात आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) लँडिंग करुन इतिहास रचला आहे. भारतीय नौदलाने या विमानाच्या रात्रीच्या लँडिंगचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचं भारतीय नौदलाने स्पष्ट केलं आहे. (वाचा सविस्तर)

होम-हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि मोदींचे भाषण… असं आहे नवीन संसदेच्या उद्धाटन कार्यक्रमाचे टाईमटेबल 

 संसदेच्या नव्या इमारतीचं 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. केंद्र सरकारचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी या तयारीला अंतिम रुप देण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी सूत्रांच्या हवाल्याने उद्घाटन दिवसाच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 मे रोजी सकाळी 7.30 ते 8:30 पर्यंत हवन आणि पूजा होणार आहे. (वाचा सविस्तर)

 नव्या संसदेत खासदारांची संख्या वाढणार? चर्चांना उधाण

 संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होत आहे आणि त्यात एका गोष्टीचीही जोरदार चर्चा आहे. नव्या संसदेत वाढलेल्या जागांची… जुन्या संसदेत लोकसभेत 543 खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत 888 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची 250 ची क्षमता वाढवून 384 करण्यात आली आहे. नवी इमारत बांधताना साहजिकच भविष्यातल्या गरजांचा विचार करुनच ती बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्यात खासदारांची भविष्यात वाढू शकणारी संख्याही गृहीत धरली आहेच.  (वाचा सविस्तर)

आजचा दिवस ‘या’ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांनी बोलताना वाणीत गोडवा ठेवावा. तर, वृषभ राशीच्या लोकांना मित्रांचं सहकार्य मिळेल. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

नाटककार, कवी राम गणेश गडकरी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म; आज इतिहासात 

आजचा दिवस महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठी आणि राजकीय क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. गोविंदाग्रज या नावाने प्रसिद्ध असलेले मराठीतील नाटककार, विनोदी लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांचा आज जन्मदिन आहे. तर, प्रशासनावर मजबूत पकड आणि त्यातून लोकहिताची कामे, प्रभावी वक्तृत्वाने सभा गाजवणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्मदिन आहे. (वाचा सविस्तर)

[ad_2]

Related posts