Thane Lift Accident Update Building Lift Collapses In Thane Major Accident Death Of Seven Laborers Know Details( प्रगत भारत । pragatbharat.com)

Thane Lift Accident Update: ठाण्यात (Thane News) घडलेल्या एका अपघातात (Accident News) सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील बाळकुम येथे एका निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आधी सहा कामगारांचा मृत्यू झालेला, तर जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली. यामध्ये सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रुफिंगचं हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं.

दुर्घटना झाल्यानंतर जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जखमींपैकी आणखी एका मजुराचा मृत्यू झाला आहे. सुनील कुमार दास (वय 21 वर्ष) या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा कामगार निपुण हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला होता. परंतु उपचारावेळेस कामगाराचा मृत्यू झालेला आहे. सदर कामगारांची बॉडी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाम साठी पाठवण्यात आली आहे.

Related posts