Nashik Latest News Chhatrapati Sambhaji Raje’s Stand To Question Government Regarding Maratha Reservation Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : ‘इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवले? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं. राणे समितीने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही. या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. आजच्या बैठकीत मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार असल्याची भूमिका छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी व्यक्त केली. 

जालन्यातील (Jalna) अंतरवाली सराटी गावात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jrange Patil) यांच्या मागण्यांवर आज सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी संभाजीराजे मुंबईला रवाना झाले आहेत. तत्पूर्वी दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचे सांगत मागील सरकारसह आताच्या सरकारला देखील याबाबत जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा तिढा सुरूच आहे, अनेकदा समित्या स्थापन करूनही टिकणार आरक्षण मराठा समाजाला (Maratha Arakshan) मिळालेले नाही, येऊ दुर्दैवी असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 

संभाजीराजे म्हणाले की, आज सर्वपक्षीय बैठक आहे, कालच मुख्यमंत्री, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा फोन आला होता. समाजासाठी मी उपस्थित राहील.. सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवलं, याचं कौतुक आहे. भावना आणि न्यायिक भूमिका यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे. इतके दिवस गरीब मराठा समाजाला बाहेर का ठेवले? मी संसद आवारात जाऊन आंदोलन केलं.. राणे समितीने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही.. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात देखील आरक्षण टिकलं नाही..या सरकारने दीड वर्षात भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे.. मी मागच्या सरकारला आणि या सरकारला देखील जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. 

कृषी मंत्री उत्तरसभांमध्ये बिझी 

एकीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात आत्महत्या (Suicide) वाढत असून ही बाब महाराष्ट्राची चिंताजनक आहे. यावर संभाजीराजे म्हणाले कि, शेतकरी आत्महत्या वाढत आहे. ब्रिटिशांनी सुरु केलेले कृषी धोरण असून अजूनही त्यात बदल झाला नाही. लाँग टर्म पॉलिसी यायला हवी. कृषी मंत्री सध्या उत्तर सभा यात बिझी आहे. जे काही राजकारणात चालू आहे, त्यात लोकांना इंटरेस्ट नाही, महाराष्ट्रातील जनतेकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तर सातारा (satara) जिल्ह्यात सोशल मीडिया पोस्टवरून चांगलाच वाद निर्माण झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून अन्य काही जण जखमी झाले आहेत. या घटनेवर बोलताना संभाजीराजे म्हणाले की अलीकडे सोशल मीडियावरून सामाजिक तणाव वाढत आहेत, यासाठी सरकारने कडक कायदा आणावा. तसेच वातावरण दूषित करणाऱ्या लोकांना थांबवलं पाहिजे, असा सल्लाही संभाजीराजे यांनी दिला. 

इतर महत्वाची बातमी : 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक, कोणाकोणाला निमंत्रण?

[ad_2]

Related posts