[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
चंद्रपूर : चंद्रपूरसह (Chandrapur) विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात सध्या सोयाबीन (Soyabean) पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचे संक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आधी मुसळधार पाऊस त्यानंतर जवळपास दीड महिना पावसाची विश्रांती यामुळे आधीच शेतपिकं धोक्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि चिमूर तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं. याविषयी माहिती मिळताच कृषी विभागाने तातडीने नियंत्रण पथकासह शेतशिवारांना भेटी दिल्या. हा विषाणूजन्य रोग असल्याचं यावेळी कृषी विभागाने माहिती दिली. तर सध्याचा काळ हा सोयाबिन पिकांचा वाढीचा असून या हा फुलोरा आणि शेंगाधरणीचा काळ आहे. त्यामुळे नेमकं याच कालावधी हा रोग फोफावत असल्यामुळे पिकांचे मोठं नुकसान होतंय.
शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
या पिवळ्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोगग्रस्त झाडे मुळातून उखडून जमिनीखाली पुरण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. तसेच पिकांभोवती निळे किंवा पिवळे सापळे लावण्याचा उपाय देखील कृषी विभागाने सांगितला आहे. या रोगामुळे पिकांची उत्पादन क्षमता जवळपास 30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. तर शेतकऱ्यांकडून देखील या रोगाचा नायनाट करण्यासाठी योग्य काळजी घेतली जात असल्याचं सांगितलं जातंय.
काय आहेत रोगाची लक्षणं?
पण आता या रोगांची लागण पिकांना कशी झाली हे ओळखणं कठीण होऊ शकतं. अशावेळी सोयाबीनच्या पानांच्या मुख्य शिरा तपासाव्यात. जर या पानांच्या मुख्य शिरांवर पिवळ्या रंगाचे किंवा अनियमित चट्टे दिसले तर पिकांना या रोगाची लागण झालेली असून शकते. तसेच पानं जशी परिपक्व होत जातात तसं त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. जर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तर सोयाबिनची पानं ही अरुंद होत जातात. पिकाच्या सुरुवातीलाच जर हा रोग झाला तर अशावेळी झाडं पूर्णपणे पिवळी पडतात. त्यामुळे अशा झाडांना कमी शेंगा येतात.
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी धान आणि सोयाबीन पिकांमुळे आपला प्रपंच कसाबसा चालवतो. पण जर सोयाबिनसारख्या नगदी पिकांवरच अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला तर काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तसेच यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडण्याची भिती देखील शेतकऱ्यांना वाटू लागलीये. त्यामुळेच या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
Agriculture News : सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू
[ad_2]