Gautami Patil Progarm Controversy Police Lathi Charge On Public Parbhani News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

परभणी : सबसे कातील… गौतमी पाटील (Gautami Patil) पुनेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) जणू तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तरुणच कशाला सर्व वयोगटातील लोक गौतमी पाटीलच्या डान्सचे दिवाणे आहेत. अनेक ठिकाणी गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम असतात. परभणीत नुकत्याच झालेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम चर्चेत आला आहे. परभणीतील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमादरम्यान, मोठा गोंधळ झाला यानंतर पोलिसांनी लाठीचार्जही केला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा

कितीही पोलीस बंदोबस्त लावा, खाजगी बंदोबस्त करा… काहीही केलं तरी गौतमी पाटील म्हटलं की राडा होणारच… याची प्रचिती पुन्हा एकदा परभणीत आली आहे. परभणीमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा डान्स आकर्षण ठरला. भाजप विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांनी गौतमी पाटीलच्या उपस्थितीत दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमात गोंधळ झाल्याने गौतम पाटील आणि तिच्या सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये पाठवण्यात आलं आणि त्यानंतर जमावाला शांत करुन दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात तरुणांकडून खुर्च्यांची मोडतोड

गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची एकच गोंधळ केला. याचं रुपांतर राड्यात झाला. कार्यक्रमात तरुणांनी मोडतोड करण्यास सुरुवात केली. काही तरुणांच्या जमावाने कार्यक्रमस्थळावरील अनेक खुर्च्यांची मोडतोड केली. यानंतर जमावाला आवर घालण्यासाठी आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी तरुणांवर सौम्य लाठीमार केला. कार्यक्रमात गोंधळ झाल्याने गौतमी पाटीलचा डान्स थांबवून तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये पाठवण्यात आलं.

नेमकं घडलं काय?

परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलावर भाजप विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गौतमी पाटीलची होती. कार्यक्रम 7 वाजता सुरू झाला आणि साडे आठ वाजता गौतमी पाटील आणि त्यांच्या सहकारी आल्या, त्यांनी एक नृत्य सुरू केलं. यानंतर जमलेल्या अनेकांनी हुल्लडबाजी सुरू केली. यानंतर खुर्च्या फेकफेकी, तोडफोड सुरू झाली. पोलिसांनी ह्या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. हा प्रकार सुरू झाला आणि गौतमी पाटील आणि त्यांच्या सहकारी व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेल्या. त्यानंतर जमाव शांत झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. हा सर्व गदारोळ जवळपास अर्धा ते पाऊण तास सुरू होता.

[ad_2]

Related posts