( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका भारतीयाने दक्षिण कोरियाच्या (South Korea) महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हाँगकाँगमध्ये या भारतीय पुरुषाने दक्षिण कोरियाच्या महिले भररस्त्यात लैंगिक छळ केला आहे. या घटनेचा धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. पीडित महिला ट्विच या ऑनलाइन ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये पीडित महिला अस्वस्थ असल्याचे पाहायला दिसत आहे. भारतीय पुरुषाने तिला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. व्लॉगर असलेली ती महिला हाँगकाँगच्या तिच्या सहलीचे रेकॉर्डिंग करत होती तेव्हा हा सगळा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये भारतीय व्यक्ती मेट्रोच्या जिन्यावर पीडित महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. ही महिला त्यावेळी घरी परतत होती. महिलेचे लक्ष वेधण्यासाठी आरोपीने सुरुवातीला पिडीतेला मदत मागितली. त्यानंतर आरोपीने अचानक तिचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. मेट्रोपर्यंत पाठलाग करत आरोपीने पुन्हा महिलेला ऐक, माझ्यासोबत चल, मी एकटा आहे, असं म्हटलं.
त्यानंतर पीडितेना माझा होत ओढू नको असे वारंवार सांगितले. मात्र तरीही आरोपी तिच्यावर जबरदस्ती करत राहिला आणि भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून तिच्या मागे गेला. एका क्षणी, आरोपीने तिला भिंतीजवळ थांबवले आणि तिच्यावर बळजबरी सुरू केली. त्यानंतर मला मदत करा असे तिने ओरडताच आरोपी पळून गेला.
Twitch streamer was sexually assaulted live in Hong Kong by a stranger. pic.twitter.com/7YwWkrQjLy
— DramaAlert (@DramaAlert) September 11, 2023
दरम्यान, अमित अशी या आरोपीची ओळख पटली आहे. सोशल मीडिया युजर्सनी आरोपीला शोधून काढलं आहे. आरोपी अमितने त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर तो राजस्थान रायफल्स या हाँगकाँगमधील भारतीय रेस्टॉरंटचा कर्मचारी असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजस्थान रायफल्सने ही व्यक्ती आमच्या रेस्टॉरंटचा गेल्या वर्षभरापासून भाग नाही असे म्हटलं आहे. दुसरीकडे या घटनेनंतर, 46 वर्षीय आरोपीला हाँगकाँग पोलिसांनी अटक केली आहे.
काही युजर्सच्या मते आरोपी अमित जरीयाल हा कांगडा, हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.