Apply For Google Winter 2024 Internshipbefore 1 October Get 80000 Rupee Stipend Know How To Register

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आघाडीची टेक कंपनी गुगलमध्ये (Google) इंटर्नशीप करण्याची सुवर्णसंधी आहे. गुगलकडून हिवाळी इंटर्नशीप (Google Winter Internship Program 2024) साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशीपसाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला दरमहा 80,000 रुपयांपर्यंत मोबदला (Stipend) मिळेल. त्यामुळे गुगलसारख्या कंपनीसोबत इंटर्नशीप (Google Internship 2024) आणि त्यासोबतच दर महिन्याला चांगला पगार मिळवण्याची ही संधी अजिबात सोडू नका. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. गुगल विंटर इंटर्नशीप प्रोगामसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करा.

कोण अर्ज दाखल करु शकतात?

कंम्प्यूटर क्षेत्रासंबंधित पदवीधर विद्यार्थी, मास्टर्स किंवा डिग्री प्रोगामच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी या इंटर्नशीपसाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशीपमध्ये तुमची सॉफ्टवेअर इंटर्न या पदावर भरती करण्यात येईल.

इंटर्नशीप कधीपासून सुरु होईल?

सॉफ्टवेअर इंटर्नसाठी विंटर इंटर्नशीप प्रोगाम जानेवारी 2024 पासून सुरु होईल, मात्र त्यासाठी आता अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ही इंटर्नशीप 22 ते 24 आठवड्यांची असेल. यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुगलच्या हैदराबाद किंवा बंगळुरु येथील ऑफिसमध्ये जॉईनिंग होईल.

इंटर्नशीपसाठीची पात्रता

या इंटर्नशीपसाठी अर्ज करणारा विद्यार्थी कम्प्यूटर क्षेत्राशी संबंधित असावा. त्यासोबतच त्याला तांत्रिक बाबींची माहिती हवी. सी, सी ++, जावा, जावास्क्रिप्ट, पायथन यासारख्या बेसिक कोडींग लँग्वेज याचं ज्ञान असावं. तसेच संबंधित विद्यार्थ्याला डेटा स्ट्रक्चर्स आणि एल्गॉर्थिज्म याबाबतही माहिती असावी.

गुगल इंटर्नशीपसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया (How to Apply for Google Winter Internship Program 2024)

  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी careers.google.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • येथे Internship Applicaiton या पर्यायावर क्लिक करा.
  • आता समोर एक पेज उघडेल यामध्ये Resume सेक्शनमध्ये जा आणि तुमचा CV जोडा. यामध्ये तुमच्या कोडिंग संदर्भातील ज्ञानाचा उल्लेख आवर्जून करा.
  • त्यानंतर Higher Education सेक्शनमध्ये जा आणि आवश्यक माहिती भरा. त्यानंतर Degree Status मध्ये Now Attending पर्याय निवडा.
  • आता तुमचा वर्तमान अधिकृत किंवा अनधिकृत इंग्रजी ट्रांसक्रिप्ट अपलोड करा.
  • तुम्हाला सोयीस्कर लोकेशन देखील भरा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts