Pune Crime News Sold In Red Light Area After Showing Job Vacancy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : बांगलादेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला  (Bangladesh) ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेकायदेशीररित्या भारतात आणून तिला पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांगलादेशातील रहिवासी असलेली तरुणी अल्पवयीन आहे. दलाल महिला मारिया उर्फ सोनी आणि दलाल असलेला एक नेपाळी पुरुष या दोघांनी या मुलीला पार्लरचे काम देतो, असे खोटे सांगून तिच्या अज्ञानपणाचा फायदा येऊन फुस लावत तिला बेकायदेशीर रित्या भारतात आणले. त्यानंतर बुधवार पेठेत कुंटणखाना चालवणाऱ्या डोलमा राजू तमांग या महिलेकडे या तरुणाला ठेवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

काहीच दिवसांपूर्वी अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश होता.  पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे बांगलादेशी लोक राहत होते. यातील 10 महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होत्या तर पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली होती. बुधवार पेठेतील सागर नावाच्या इमारतीतून या 19 जणांना ताब्यात घेतलं होतं. या 19 जणांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. तसेच भारत बांगलादेशी सीमेवरुन अनधिकृत भारतात प्रवेश केल्याचं देखीस समोर आलं होतं.

पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं…

पोलिसांना विशेष शोध मोहीम राबवण्याचे आदेश असून त्याअंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध भागात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना या घडत असतानाच बांगलादेशी घुसखोरांमुळे आगामी काळात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर उदभवणार नाही ना? याकडेही पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

हेही वाचा-

[ad_2]

Related posts