[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या अपात्रता प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर आज सुनावणी होत आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. या सुनावणीला सामोरं जाण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तयारी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रता प्रकऱणाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होणार
शिंदेंच्या शिवसेनेचे 40 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 14 अशा 54 आमदारांच्या मिळून तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी शिवसेना ठाकरे गट वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार आहे. त्यासाठी ठाकरे गटानं वकिलांची फौजही तयार ठेवली आहे. तसंच सुनावणीसाठी उत्तरंही तयार ठेवली आहेत. याआधी अध्यक्षांच्या लेखी नोटीसला ठाकरे गटाच्या आमदारांनी संयुक्तपणे लेखी उत्तर सादर केलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं सुनावणीसाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाची रणनीती ठरली
आज होणाऱ्या सुनावणीला कसं सामोरं जायचं याचं नियोजन ठाकरे गटानं केलं आहे. ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकील आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना आपलं म्हणणं मांडा असं सांगितलं तरच आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. आज सकाळी 11 वाजता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची एक बैठक होईल. त्यानंतर 12 वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील.
मागील काही महिन्यांपासून आमदार अपत्राततेची सुनावणी कधी होणार याची उत्सुकता सर्वाना लागली होती. आता आमदार अपत्रातता सुनावणी प्रकरणाची वेळ काहीच तासांवर येऊन ठेपली आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. तशी तयारी आता विधान भवनात सुरू झाली असून आज दिवसभर ही सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे
– शिवसेना (शिंदे गट) 40 आणि उबाठा 14 आमदारांची होणार सुनावणी.
– तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष घेणार सुनावणी.
– वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची देणार संधी.
– प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार.
– विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदाराना आपलं म्हणणं मांडायला संधी देणार.
– मग पुढे आमदार आपले पुरावे सादर करतील तसेच एकमेकांना पुराव्याच पेपर सुद्धा देतील.
– मग विधिमंडळ सर्वाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेचं वेगळं इशू फ्रेम करेल.
– आज दिवसभर ही सुनावणी सुरू राहील.
ही बातमी वाचा:
[ad_2]