Maharashtra Rain News Heavy Rain Warning In The Maharashtra Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, खरीपाची पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers) चांगल्या पावसाची गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. त्यामुळं बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पवसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं त्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. शेतातील उभी पिंक वाचवण्यासाठी पावसाची गरज आहे. 

पावसाचा मोठा खंड

यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आणि जून महिना कोरडा गेला. त्यात जुलै महिन्यात तोडफार  पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान मिळालं होतं. मात्र, ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला. त्यामुळं पावसाचा मोठा खंड पडला आहे. राज्यातील 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड, तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर ही पिकं पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाझर तलावातील पाणी देखील आटले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिकं तर अक्षरशः करपून गेली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने प्रकल्पातील पाणीसाठा देखील चिंता वाढवणारा ठरत आहे. 

एल निनोचा पावसावर परिणाम

यावर्षी एल निनोटा पावसावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या एल निनोमुळे भारतातील हवामानावर परिणाम होत आहे. सध्या भारतातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. हा एल निनोचा प्रभाव आणि त्यामुळे भारताला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास ‘एल निनो’ म्हणतात. याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला आहे. अनेक भागात पावसाची गरज आहे. मात्र, पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Weather Update : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! मोठ्या ब्रेकनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुण्यातलं वातावरण कसं असेल?

[ad_2]

Related posts