Union Minister Narayan Rane Strongly Criticize On Shiv Sena Ubt Chief Uddhav Thackeray For Remark On DCM Devendra Fadnavis



( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री  नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टरबूज म्हणाले पण आमचे देवेंद्र देखणे असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवस देखील मंत्रालयात आले नाही आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

नारायण राणे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, उद्धव यांनी आधी चांगले बोलायला शिकले पाहिजे. आपलं योगदान काय आहे याचा विचार त्यांनी करावा. बाळासाहेब कधी कुणाच्या घरी गेले नाहीत. देशपातळीवरचे नेते बाळासाहेबांना भेटायला यायचे. पण उद्धव हे ठाकरे नावाला कलंक आहेत. राहुल गांधी कागद फडकवत आलेत. 37 पक्ष आलेत पण गोधडी कशी शिवणार असा प्रश्नही त्यांनी केला. उद्धव ठाकरे सध्या सर्वांच्या घरी जात आहेत. कुणाच्या घरी जाणे सोडलेले नाही. उद्धव ठाकरे सध्या पंतप्रधान पदाचे आवंडे घोटत असल्याची बोचरी टीका राणे यांनी केली. 

ठाकरेंचा पंचनामा करणार 

उद्धव ठाकरे जिथे दौरे काढतील तिथे जाणार असून त्याचे मी पंचनामे मी करणार असल्याचे आव्हान ही राणे दिले आहे. लंडनला काय आहे हे योग्य वेळ आली की दाखवणार असल्याचेही राणे यांनी म्हटले. 

सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळींची मागणी नाही

सरसकट दाखले करू नका. राज्य सरकारने घटनेतील 15/4 चा अभ्यास करावा. सरसकट कुणबी दाखला ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. राज्यात 38 टक्के मराठा समाज आहे जे गरीब आहेत. मराठा समाजातील वर्गाला आरक्षण द्यावे पण कुणाचेही आरक्षण काढून हे आरक्षण देऊ नये, असंही राणेंनी नमूद केलं.

आरक्षण देताना द्वेषाची भावना नको

घटनेने तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. ज्याला इतिहासाची जाण आहे त्यानेच या विषयावर बोलावं. यापूर्वी जी आरक्षण देण्यात आली तेव्हा मराठेच मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना द्वेषाची भावना असू नये, अशी अपेक्षा नारायण राणेंनी व्यक्त केली.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Related posts