Pune Bamboo Market Pune Bamboo Market Decoration Of Lord Ganpati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने (ganeshotsav 2023) भक्तांची मखर, गणरायाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. थर्माकोलच्या मखरऐवजी आता इको-फ्रेंडली मखरांना  भक्तांकडून अधिक मागणी वाढू लागली आहे. पुण्यात  बुरुड आळीत बांबूवर (bamboo) कलाकुसर करून आकर्षक मखर बनवले जात आहेत.  

लोकांचा कल आता पर्यावरणपूरक सजावटीकडे वाढतोय, गौरी- गणपतीच्या काळात या गल्लीला विशेष महत्त्व आहे. येथे पाहिजे त्या आकारात, पाहिजे त्या डिझाइनमध्ये आपल्या पसंतीस पडेल आणि खिशाला परवडणारे असे गौरी-गणपतीसाठी लागणारे सजावटीचे मखर, महालक्ष्मीचे स्टॅन्ड आणि पर्यावरणपूरक वस्तू जागेवरच बनवून मिळतात. कमानी, नक्षीदार खांब, मंदिरे, बोट, कमळ, शनिवारवाड्याची प्रतिकृती, नारळ, मोदक अशा वेगवेगळ्या वस्तू विविध आकारामध्ये तयार करून मिळतात. 

विशेषत: सजावटीसाठी लागणारे मखर बांबूपासून आणि बॅटम पट्ट्यांपासून बनवून मिळतात. बांबूचे साहित्य पर्यावरणपूरक आणि इतर सजावटपूरक साहित्यपेक्षा कमी पैशात मिळते. घरगुती गणेशोत्सवासाठी आणि गौरीला लागणार्‍या सजावटीसाठी बांबूपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तूंना पुणेकरांची विशेष पसंती आहे, यामध्येबांबूपासून बनवलेल्या सजावटीच्या  बांबू कमान सिंहासन,नारळ , मोदक, होडी,  कमळ , महिरप (कमान) ,झोपाळा,  झोपडी, मोर इत्यादी वस्तू आहेत.

जुनी परंपरा आणि नवी फॅशन

सध्या बाजारात नवनव्या डेकोरेशनच्या वस्तू उपलब्ध आहेत. प्लास्टिकच्या वस्तुंपासून ते काचेच्या वस्तुंपर्यंत अनेक प्रकारच्या सुंदर आणि सुबक डेकोरेशनच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहे. त्यात 100 रुपयांपासून तर लाख रुपयांपर्यंत अनेक वस्तू बाजारात विकायला आहेत. मात्र या सगळ्यातदेखील बांबुच्या विविध कलाकृती घेण्यासाठी नागरिक या बुरुड आळीत गर्दी करतात. या बाजारात मिळणाऱ्या विविध वस्तू अजुनही अनेकांना आकर्षित करतात. टोपल्या, कंदील आणि विविध प्रकारच्या कलाकृती विक्रीसाठी असतात. त्यात पारंपारिक कंदील टोपल्या तर मिळतातच मात्र अलीकडे फॅशनेबल नाईट लॅम्पही वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. सोबत बांबूंची खेळणीदेखील अनेकांना आकर्षित करतात. त्यामुळेच जुनी परंपरा जपताना नव्या फॅशनचा ट्रेन्डही या बाजारात बघायला मिळते. 

पुण्यातील गणेशपेठेजवळ ही बुरुड आळी आहे. मूळतः 18 व्या शतकात स्थापन झालेले हे मार्केट शहरातील बांबुच्या कलाकृतींसाठी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या आळीत शिरताच बांबुच्या विविध कलाकृती बघायला मिळतात. या आळीत दुकानदार आणि बहुतेक कारागीर हे सातारा, अहमदनगर आणि कर्नाटकातील स्थलांतरित आहेत जे 18 व्या शतकात पुण्यात स्थायिक झाले.

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganeshotsav News : पुण्यातील गणेशोत्सवात रंगणार राजकीय आखाडा, देखाव्यासाठी मोदी, फडणवीस अन् अनेक नेत्यांच्या हुबेहुब प्रतिकृती

[ad_2]

Related posts