[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
iPhone 15 pro Max : अॅपल (Apple) कंपनीकडून iPhone 15 सीरीज नुकतीच लॉंच करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 15 सप्टेंबरपासून तुम्हाला हा फोन प्री-बुक करता येणार आहे. तसं पाहायला गेलं तर, भारतात आयफोन 15 सीरीज ही इतर देशांच्या तुलनेत खूप महाग आहे. इतर देशांच्या तुलनेत प्रो मॅक्स मॉडेलमध्ये काही हजार रुपयांचा फरक आहे. अशात, जर तुम्हाला iPhone 15 pro Max मोफत विकत घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला असे दोन मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात नवीन फोन मिळेल आणि तुमची परदेशवारीही होईल. चांगली गोष्ट अशी आहे की, या सगळ्यात आयफोन विकत घेताना तुमचे बऱ्याच प्रमाणात पैसे वाचतील.
या देशांमध्ये फोन मिळतील स्वस्त
Apple च्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतात iPhone 15 Pro Max च्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,59,900 रुपये आहे. तर, हेच फोन तुम्हाला दुबई आणि हाँगकाँगमध्ये स्वस्त मिळतील. हाँगकाँगमध्ये या फोनची किंमत HK $10199 आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 1,08,058 रुपये आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जवळपास 50,000 रुपये वाचवू शकता. 29 सप्टेंबरच्या एअर इंडियाच्या फ्लाइटचा डेटा पाहिला तर या देशात जाण्यासाठी विमान प्रवासाचा एकूण खर्च 28,138 रुपये आहे. फोन खरेदी केल्यानंतर, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही हाँगकाँगमध्ये 1 किंवा 2 दिवस राहू शकता, ज्याची एकूण किंमत सुमारे 15,000 रुपये असेल. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही पुन्हा भारतात परत येऊ शकता.
दुबईमध्ये थोडा महाग आहे प्रो मॅक्स
हाँगकाँगपेक्षा दुबईमध्ये आयफोन 15 प्रो मॅक्स किंचित जास्त महाग आहे. येथे तुम्हाला सुमारे 1.15 लाख रुपयांमध्ये 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. दुबईची फ्लाइट 8 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे. तुम्ही एक-दोन दिवस इथे राहू शकता. दुबईमध्ये वेळ घालवण्यासाठी भारताच्या तुलनेत तुम्हाला नक्कीच 4 ते 5,000 रुपये मोजावे लागतील.
भारतापेक्षा इतर देशांमध्ये स्वस्त आयफोन
लक्षात ठेवा, या लेखाचा उद्देश तुम्हाला हे सांगण्याचा आहे की नवीन आयफोन भारतापेक्षा इतर देशांमध्ये स्वस्त आहे. आम्ही तुम्हाला परदेशात प्रवास करण्याचा सल्ला देत नाही. अन्यथा तुमची प्रिय व्यक्ती किंवा नातेवाईकांपैकी कोणी भारताबाहेर या देशात राहत असेल तर, तुम्ही त्यांच्याकडून नवीन आयफोन खरेदी करून मागवू शकता.
इतर बातम्या
iPhone 15 Pro vs iPhone 14 Pro : आयफोन 15 Pro घ्यावा की 14 Pro? किंमत आणि फिचर्समध्ये काय आहे फरक? घ्या जाणून
[ad_2]