Ncp Rohit Pawar On Bjp Nitesh Rane Election Commission And Ajit Pawar Maharashtra Politics Marathi News Update  

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर: राणेंना कोंबडी आणि अंडी याबद्दल इतका का लगाव आहे मला माहिती नाही, पण मला जिथे पाहिजेत तिथे सगळीकडे केस आहेत अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका केली. मराठा हा मराठा असतो, त्यांना वेगवेगळ्या भागात विभागू नये अशी प्रतिक्रियाही त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर दिली. अजित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar) हे मोठे नेते आहेत, काही कामानिमित्त ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसतील असंही ते म्हणाले. 

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करताना रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच आहेत, त्यांना दाढी मिशाच फुटलेले नाही असं म्हटलं होतं. यावर रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राणेंना कोंबडी आणि अंड्यात एवढा लगाव का आहे याबाबत मला माहिती नाही. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत असं म्हणत त्यांनी नितेश राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Rohit Pawar On Election Commison : निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबत प्रतिक्रिया

येत्या 6 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सुनावणी होणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, “निवडणूक आयोग काय निर्णय देतो ते पाहुयात. निवडणूक आयोग आणि त्याचे आयुक्त हे भाजपच्या हातचे बाहुले आहेत, पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.”

Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांनी शरद पवारांसमोर येणं का टाळलं?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला येण्याचं टाळलं. बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार होते. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले की, अजित दादा हे मोठे नेते आहेत आणि त्यांचे पदही मोठा आहे. त्यामुळे कदाचित ते काही कामानिमित्त या बैठकीला येऊ शकले नसतील असं मला वाटतं.

राधाकृष्ण विखे, राम शिंदेंना रोहित पवारांचा टोला

जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. या उपोषण स्थळी अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भेट देणार होते. मात्र अचानकपणे त्यांनी आपला दौरा रद्द केला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल. सोबतच विधान परिषदेचे स्थानिक आमदार राम शिंदे यांनाही टोला लगावला. खरंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी या उपोषणस्थळी भेट द्यायला हवी होती. मात्र ते कामात व्यस्त असावेत म्हणून ते आले नसावेत. पण धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असंच भाजपच्या नेत्यांना वाटतं नसावं असा टोला रोहित पवार यांनी लगावला. राम शिंदे यांच्या घराजवळ हे उपोषण सुरू असताना आणि त्यांचे सरकार असताना हे उपोषण सोडवण्यासाठी त्यांना एकही मंत्री आणता आला नाही, यावरून त्यांचं सरकारमध्ये किती वजन आहे याचा विचार करावा लागेल असा टोलाही त्यांनी लगावला. 

रोहित पवार ऑन मराठवाडा मंत्रिमंडळ बैठक

उद्या मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. याबाबत आमदार रोहित पवारांना विचारले असता (Rohit Pawar On Marathwada Mantrimandal Baithak) मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र यापूर्वीही एक बैठक मराठवाड्यात झाली होती. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा निधी हा मराठवाड्याला मिळाला नाही, आता यावेळी तरी मराठवाड्याला निधी मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

 

[ad_2]

Related posts