[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : देशभरातील लाखो भाविकांना गुरुवार (15 सप्टेंबर) रोजी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) प्रथम दर्शन घडलं. गुरुवार (15 सप्टेंबर) रोजी लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला. तर यंदाचा लालबागचा राजाचा दरबारात रायगडाची (Raigad) प्रतिकृती साकारण्यात आलीये. ही कलाकृती कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची अखेरची कलाकृती आहे. लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. त्याचप्रमाणे लालबागनगरी देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान लालबागच्या राजाचं यंदाचं काय खास वैशिष्ट्य आहे याबाबत मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळी आणि मूर्तिकार संतोष कांबळी यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे.
राजासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा
शिवराज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी 350 वर्षी पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लालबागचा मंडपात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आलीये. त्याचप्रमाणे राजाच्या व्यासपीठावर देखील तितकाचं सुंदर देखावा साकारण्यात आला आहे. यंदा लालबागचा राजा हा मेघडांबरीवर विराजमान झाला आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची मनमोहक मूर्ती आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी बोलतांना मंडळाचे बाळासाहेब कांबळे यांनी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी यंदा लालबागच्या दरबारात साकारलेली लालबागच्या राजाची प्रतिकृती ही शेवटची ठरली. तर त्यांनी साकारलेल्या प्रतिकृतीचे मंडळाच्या अध्यक्षांनी कौतुक केलं.
ही आहे यंदाची खासियत
लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्यासोबत देखील एबीपी माझाने संवाद साधाला. यावेळी त्यांनी देखील बोलतांना नितीन देसाईंची आठवण काढली. शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जो शिवरायांचा दरबार होता तो तयार करण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच शिवरायांच्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाची प्रतिकृती देखील यावेळी साकारण्यात आलीये.
दरवर्षी लालबागच्या राजाचा मंडप हा वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात येतो. मागील वर्षी राजाच्या मंडपाता राममंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गेली अनेक वर्ष कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे लालबागच्या राजाचा दरबार सजवायचे. यंदाची देखील प्रतिकृती त्यांनीच साकार केली आहे. त्यामुळे यंदाची ही प्रतिकृती मंडळासाठी विशेष असल्याचं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे.
या मंडपात शिवरायांच्या राजमुद्रेची देखील प्रतिमा साकारण्यात आली आहे. महाद्वारावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीये. तर प्रथम दर्शन सोहळ्यावेळी शिवकालीन नृत्याविष्कार सादर करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबागनगरीत येत असतात. अनेक दिग्गज मंडळीदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.
हेही वाचा :
Lalbaugcha Raja : ‘ही शान कोणाची…’ लालबागच्या राजाची पहिली झलक, राजाचं 90व्या वर्षात पदार्पण; पाहा व्हिडिओ
[ad_2]