Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 16th September 2023 Saturday Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव

धाराशिव : औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदललं आहे. आता शहरानंतर जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव झालं आहे. राज्य सरकारने काल (15 सप्टेंबर) राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहे. त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

देशभरात आज पावसाचा अंदाज; दिल्लीसह ‘या’ राज्यांना अलर्ट, जाणून घ्या तुमच्या विभागातील स्थिती

India Weather Update: सध्या देशभरातील अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर हवामानात बदल झाला आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातल्याने लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये आज (16 सप्टेंबर) पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी देखील हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे, तिथेही पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर

अनंतनागमध्ये चौथ्या दिवशीही चकमक सुरुच; लष्कराने दहशतवाद्यांवर रॉकेट लाँचरसह केला बॉम्बचा हल्ला

Anantnag Encounter Continued : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये सध्या भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे. येथील कोकरनागमध्ये आज शनिवारी (16 सप्टेंबर) सलग चौथ्या दिवशीही दहशतवाद्यांशी चकमक सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकरनागच्या जंगलात 2-3 दहशतवादी लपून बसले आहेत, ज्यांना भारतीय लष्कराने घेरले आहे. ऑपरेशन लवकर संपवण्यासाठी त्यांच्यावर रॉकेट लाँचर आणि इतर जड शस्त्रांनी हल्ले केले जात आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कर डोंगरावर ड्रोनने बॉम्बफेक करत आहे. रॉकेट लाँचरमधून बॉम्बफेकीचा व्हिडीओही समोर आला आहे. वाचा सविस्तर

देशभरातील काँग्रेस नेते हैदराबादमध्ये एकत्र येणार, काय असणार रणनीती? वाचा सविस्तर 

Congress Working Committee Meeting : देशभरातील काँग्रेस नेते आज हैदराबादमध्ये एकत्र येणार आहेत. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रसचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या अध्यक्षतेखाली आज (16 सप्टेंबर) हैदराबाद मध्ये कॉंग्रेस कार्यकारिणीचीदोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत तेलंगणासह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार असून, त्यासाठी रणनीतीही आखली जाणार आहे. वाचा सविस्तर

NASA : मंगळ किंवा चंद्र नाही, तर ‘या’ ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता? नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने लावला शोध 

NASA James Webb Space Telescope : पृथ्वीवरील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आता मानवासाठी पृथ्वी कमी पडत चालली आहे, म्हणूनच मानव आता इतर ग्रहांवर जीवनाचा शोध घेत आहे. सध्या आपण चंद्र आणि मंगळावर पोहोचलो आहोत, पण इथे जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, आपण ज्या ग्रहाबद्दल बोलत आहोत, तेथे जीवनाची शक्यता खूप जास्त आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचा असा विश्वास आहे की, या ग्रहावर पाण्याने भरलेल्या महासागरांचे संकेत आहेत असा आहे. या अनोख्या आणि जीवसृष्टीची शक्यता असलेल्या ग्रहाबद्दल जाणून घ्या. वाचा सविस्तर

मेक्सिको स्पेनच्या गुलामीतून मुक्त, ब्रिटन मंदीच्या खाईत आणि भारतरत्न एम एस सुब्बालक्ष्मी यांचा जन्म; आज इतिहासात

मुंबई: सप्टेंबर महिना हा भारताच्या तसेच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यातही 16 सप्टेंबर रोजी जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. आजच्याच दिवशी मेक्सिकोने स्वत:ला स्पेनच्या गुलामीतून मुक्त झाल्याचं जाहीर केलं. तर भारत आणि भूटानच्या मैत्री संबंधासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भारत विरोधी कोणत्याही कृत्यासाठी आपली भूमी वापरू देणार नाही असं आश्वासन भूटानने दिलं होतं. वाचा सविस्तर

मिथुन, तूळ, मकरसह ‘या’ राशीच्या लोकांवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 16 September 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. एकूणच मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

आता ड्रायव्हिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार, Android Auto वरुन झूम कॉल करता येणार

Google Android Auto : गुगल नेहमीच नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक फीचर्स अपडेट करत असतं. यामुळे यूजर्स अगदी सहजपणे या फीचर्सचा वापर करू शकतात. त्यांचे काम अधिक सोपे होते. काही काळापूर्वी, गुगलने (Google) सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी कारची इन्फोटेनमेंट सिस्टम अपग्रेड करण्याच्या संदर्भात माहिती दिली होती. यालाच आता Google ने अपडेट केले आहे आणि आता Google ने अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे, की, ज्यामध्ये नवीन Android Auto कोणत्या फीचर्सने सुसज्ज आहे हे सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

[ad_2]

Related posts