[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव (Ganeshostav) हा सर्वांचा उत्साहाचा विषय आहे. तर याच गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून (Government) सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील (Mumbai) गणेश मंडळांना उत्तेजन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाच प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे यांनी सांगितलं आहे. मागील वर्षी राज्य शासनाने सर्व गणेशोत्सवाचे निर्बंध उठवण्यात आले. त्यामुळे यंदा देखील गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाईल, असं नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे यांनी म्हटलंय.
या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस हे तीन लाख रुपयांचे ठेवण्यात आले असून दुसरे बक्षीस हे दोन लाख रुपये असणार आहे. तसेच 50 गणेश मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल. तर उत्तेजनार्थ म्हणून 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे फॉर्म हे शिवसेनेच्या शाखेत उपलब्ध असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. तर 16 ते 21 सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली जाईल. या स्पर्धांसाठी नियम आणि अटी लागू करण्यात येतील.
असं केलं जाणार स्पर्धेसाठी मूल्यांकन
या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट या निकषांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये थर्मोकोल किंवा प्लास्टिक विरहित गणेश स्पर्धांचे देखील मूल्यांकन केले जाईल. तसेच पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या समाजप्रबोधन करणाऱ्या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढील वर्षी 350 वा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने देखील सजावट, देखावा यांचा देखील या मूल्यांकनासाठी समावेश करण्यात येणार आहे.
तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनावर देखील या स्पर्धेचे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे यांचा समावेश करण्यात आला आहे.
‘हे’ आहेत स्पर्धेचे निकष
या स्पर्धेसाठी विविध निकष देखील ठरवण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या गणपती मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता होणार आहेत. तसेच ज्या गणपती मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची परवागनी घेतली आहे त्यांना देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.
गणेशोत्सव सणानिमित्त प्रत्येक मंडळाकडून समाज प्रबोधनाचे कार्य व्हावे या हेतून शासनाकडून या उपक्रम राबण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. तर आता या स्पर्धेचे मानकरी कोण ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Ganeshotsav 2023 : राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन, पर्यटन मंत्री गिरिश महाजनांची घोषणा
[ad_2]