Shani Nakshatra Gochar Shani Dev will enter Dhanishtha Nakshatra See for which signs the transit will be auspicious and inauspicious

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Saturn Nakshatra Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार शनिदेवांचं गोचर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. यावेळी शनी देव यांच्या राशीतील बदलामुळे सर्व राशींवर होणारे परिणामही बदलतात. 15 ऑक्टोबर रोजी शनिदेव राहूचं नक्षत्र शतभिषा सोडून धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.

यावेळी अनेक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसणार आहे. मंगळ हा धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी असून शनी मंगळाशी शत्रुत्व करणारा मानला जातो. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र गोचरचा अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

धनिष्ठा नक्षत्र म्हणजे नेमकं काय ?

27 नक्षत्रांपैकी धनिष्ठा हे 23 वं नक्षत्र आहे. याचा अर्थ ‘सर्वात श्रीमंत’ असा होतो. जर तुमचा जन्म धनिष्ठ नक्षत्रात झाला असेल तर तुमची राशी मकर किंवा कुंभ असण्याची शक्यता असते. धनिष्ठामध्ये जन्मलेली व्यक्ती आयुष्यभर मंगळ आणि शनीच्या प्रभावाखाली राहते. 

या राशींना मिळणार सकारात्मक परिणाम

शनीच्या नक्षत्र बदलामुळे मेष आणि वृश्चिक म्हणजेच मंगळाच्या अधिपत्याखालील राशींना फायदा होणार आहे. शनीच्या मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहणार आहे. तसंच मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांसाठीही काळ उत्तम राहणार आहे. मात्र यावेळी या राशीच्या लोकांच्या कुंडलीत मंगळ शुभ असला पाहिजे. या काळात व्यक्ती अधिक उत्साह दाखवतील आणि धाडसी निर्णय घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार आहेत.

नकारात्मक परिणाम

वृषभ, कर्क, कन्या, धनु, मीन इत्यादी राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मंगळ आणि शनीचा प्रभाव तुम्हाला चुकीच्या कृतींकडे प्रवृत्त करू शकतो. यावेळी पत्नीसोबत वाद होऊ शकतात आणि कुटुंबातील काही संबंध तुटू शकतात. कोर्ट केसेस होऊन या समस्या वाढू शकतात. तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts