[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sangli Maratha Kranti Morcha : सांगलीत (Sangli) मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) सुरुवात झाली आहे. शहरातील विश्रामबाग चौक मधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा राम मंदिरापर्यंत निघणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. मराठा आरक्षण तसेच जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहे.
मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो
आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या मुलांनी चांगले गुण असूनही संधी मिळत नाही. त्यामुळं आम्हाला आमचे हक्क मिळावेत अशा भावना मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चासाठी गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली होती. काल एक दिवस अगोदर मोर्चासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोर्चात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सहभागी होणार आहेत.
100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालीआहे. 100 वर्षीय जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करुन मोर्चाला पुढे निघाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून जिजाऊ वंदनाने मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. मशाल हाती घेतलेल्या महिलांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघत आहे. सध्या मोर्चावर संततधारदार पावसाची हजेरी सुरु आहे.
असा असेल मोर्चाचा मार्ग
विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. त्यानंतप पुढे मोर्चा गेस्ट हाऊस, मार्केट यार्ड, कर्मवीर चौक मार्गे राम मंदिर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी केवळ चार भाषणे होणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे. दरम्यान, आज सांगलीत सुरु झालेल्या मोर्चाला विराट स्वरुप प्राप्त झालं आहे. मोठ्या संख्येनं मराठी बांधव या मोर्चात सहभागी झाले आहे. विशेष बाब म्हणजे या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या आहेत. आमच्या मुलांच्या भविष्यासासाठी आम्ही एकत्र आला असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Maratha kranti Morcha in Sangli : सांगलीत आज मराठा वादळ घोंगावणार, मराठा क्रांती मोर्चाकडून 2.0 विराट मोर्चा; पार्किंग, कोणत्या मार्गावरून मोर्चा जाणार?
[ad_2]