Budhaditya Rajyog will be formed due to the conjunction of Sun and Mercury very auspicious and fruitful for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budhaditya Rajyog: ठराविक काळानंतर ग्रह आपली राशी बदलतात. याला गोचर असं म्हणतात. ग्रहांच्या या राशी बदलाच्या वेळी 2 ग्रह एकाच राशीमध्ये येतात. यावेळी अनेकदा राजयोग देखील तयार होतात. येत्या ऑक्टोबर महिन्यात सूर्य आणि बुध या ग्रहांचे राजे आपली राशी बदलणार आहेत, त्यामुळे बुधादित्य राज योग तयार होणार आहे.

सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. चला जाणून घेऊया बुधादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींचं नशीब फळफळणार आहे.

मेष रास

बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्यावसायिकाला मोठा आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळू शकतो. त्याच वेळी, आर्थिक परिस्थिती मजबूत राहणार आहे. व्यवसाय आणि नोकरीतही मोठा आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत.

तूळ रास

बुधादित्य राज योगामुळे तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी शुभ मानला जातो. आजारामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो. कामाच्या ठिकाणी यशासोबतच इतर क्षेत्रातही यश मिळणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. या राज योगाच्या प्रभावामुळे व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts