Ganeshostav 2023 Political Leaders Ganesh And Celebriti Ganpati News Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: राज्यात आज सर्वत्र गणेश उत्सव पहायला मिळाला. राज्यातील प्रत्येक कुटुंबात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा (Ganeshostav 2023) करण्यात आली. राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही आज सहकुटुंब बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर आज गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

भाजप नेते नारायण राणे, विनोद तावडे यांच्या निवास्थानी बाप्पाचं आगमन झालंय. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सहकुटुंब बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा केली. काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदेंच्या मुंबईतील निवास्थानी बाप्पा विराजमान झालाय. मंत्री राधाकृषण विघे पाटील यांच्या हस्ते प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर श्रीगणेशाची स्थापना करण्यात आलीय.

कोकणात गणेश चतुर्थीचा उत्साह

कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सिंधुदुर्गात 71,798 घरी बाप्पांचं आगमन होत असून मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जातेय. रत्नागिरीतल्या पावस, पूर्णगड भागात होडीतून बाप्पाचं आगमन झालंय. कोकणात गणेशोत्सवाचा सणअगदी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळे फुगड्या घालून, टीपरी नृत्य करतच बाप्पाचं स्वागत केलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील तूरळ गावच्या महिलांनी टिपरी नृत्य ही लोककला आजही जपली. आता कोकणात पुढचे दहा दिवस हा असाच उत्साह पहायला मिळणार आहे. 

कोल्हापुरात गणशाचं धुमधडाक्यात स्वागत

कोल्हापुरातही लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत अगदी धुमधडाक्यात करण्यात आलं. कोल्हापुरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश इथं घरगुती गणपती नेण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली. घरातील लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनीच बाप्पाचं स्वागत केलं.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेशाचं आगमन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या ठाण्यातील घरीही गणपतीचं आगमन झालं. 

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणेशाचं आगमन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी विधीवत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या आई, पत्नी अमृता आणि मुलगी दिविजासह इतर कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या राज्यासमोर आणि देशासमोर जी विघ्न आहेत ती गणेशाचं वंदन केलं की दूर होतात अशा भावना यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवल्या. तर अमृता फडणवीसांनी राज्यात समृद्धी नांदू दे असं साकडे घालत बाप्पासाठी खास गाणंही म्हटलं. मोदी सरकारच्या महिला आरक्षण बिलला सर्वपक्षीय समर्थन मिळेल आणि या अधिवेशनात हे बिल पास होईल अशी अपेक्षा फडणवीसांनी बोलून दाखवली.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts