[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कल्याणच्या सुभेदार वाड्यात यंदा सलग १२९व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सुभेदार वाड्यातल्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी १८९५ साली सुरु केला. पुण्यात १८९४ साली सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव कल्याणच्या बापूसाहेब फडके यांनी बघितला होता. कल्याणमध्ये त्याच धर्तीवरगणेशोत्सव सुरु करण्यासाठी फडकेंनी प्रयत्न केला. त्यानंतर पुढील वर्षीच म्हणजे १८९५ साली लोकमान्य टिळकांनी कल्याणच्या सुभेदार वाड्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. या गणेशोत्सवाला टिळकांनी १९०६ साली पुन्हा भेट दिली होती. </p>
[ad_2]