Shani Rahu Guru Yuti : 1100 वर्षांनंतर गुरु, शनि आणि राहुचा दुर्मिळ संयोग! ‘या’ 3 राशींसाठी ठरणार वरदान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Rahu Guru Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र गोचरला अतिशय महत्त्व आहे. एका ठराविक वेळेनंतर ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलतात. ज्योतिषशास्त्रानुसार या हालचालीचा मानवी जीवनावर परिणाम होतो. काही राशींसाठी हा सकारात्मक बदल घडून आणता तर काही राशींच्या लोकांसाठी अशुभ ठरतो. या ग्रह गोचरमुळे अनेक दुर्मिळ योगायोग देखील घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात एक दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. तब्बल 1100 वर्षांनंतर शनि-राहू आणि बृहस्पति यांचा संयोग घडला आहे. सध्या गुरू आणि राहू मेष राशीत असून ते शनिच्या प्रभावाखाली आहे. या त्रिग्रही संयोगामुळे तीन राशींसाठी वरदान ठरणार आहे. चला तर मग जाणून घ्या या तुमची रास आहे का? (shani rahu guru yuti rare conjunction of jupiter and saturn rahu after 1100 years these 3 zodiac signs get money)

मेष (Aries Zodiac) 

शनि-राहू आणि गुरूच्या संयोगाने तयार होणारा दुर्मिळ योग हा मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला या दिवसांमध्ये एका चांगल्या पगाराच्या आणि प्रतिष्ठत कंपनीकडून नोकरीची ऑफर येणार आहे. व्यवसायिकांसाठी हा संयोग लाभदायक असून तुम्हाला 30 ऑक्टोबरपर्यंत मोठा आर्थिक फायदा होणार आहे. या राशीसाठी हा दुर्मिळ त्रि-ग्रहांचा संयोग वरदान ठरणार आहे. 

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनि, राहू आणि गुरूचा दुर्मिळ संयोग अत्यंत शुभदायी आणि लाभदायक सिद्ध होणार आहे. अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांना 30 ऑक्टोबरपर्यंत अनेक लाभाच्या संधी प्राप्त होणार आहे. या काळात तुम्हाला परदेशातून नोकरीची ऑफर मिळणार आहे. ज्यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. यासोबतच या काळात मुलांकडून चांगली बातमी कानावर पडणार आहे. आरोग्यासाठी हा संयोग उत्तम ठरणार आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार शनि-राहू आणि गुरूचा दुर्मिळ संयोग धनु राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत बढतीचा योग आहे. व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढणार आहे. तसंच, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना या काळात आनंदाची बातमी मिळणार आहे. राहूमुळे धार्मिक कार्यात तुमची ओढी वाढणार आहे. या काळात वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts