Iphone 15 Series First Sale Starts Today Check Price Bank Offers And Discount Details Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Series : नुकत्याच लॉंन्च झालेल्या आयफोनची (iPhone) आजपासून विक्री सुरु झाली आहे. हा आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची सकाळपासून स्टोअरवर गर्दी पाहायला मिळतेय. आयफोन 15 (iPhone 15) लॉन्च झाल्यापासून त्याच्या खरेदीसाठी आयफोन प्रेमी फार प्रतीक्षा करत होते. याचं कारण म्हणजे या फोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन्स. त्याचबरोबर कंपनीने या आयफोन सीरिजवर अनेक डिस्काऊंट ऑफर्स देखील दिल्या आहेत. या वेगवेगळ्या भन्नाट ऑफर्स नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

ज्यांनी Amazon वरून आयफोनची प्री-बुकिंग केली आहे त्यांना उद्यापासून डिलिव्हरी मिळणे सुरू होईल. iPhone 15 ची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरू होते. कंपनी नवीन सीरिजवर ग्राहकांना सूटही देत ​​आहे. तुम्ही नवीन सीरिज खरेदी करत असाल तर त्यावर उपलब्ध असलेल्या ऑफर आणि सवलती अजिबात चुकवू नका.

Apple च्या ऑफिशियल वेबसाईटवर बंपर सवलत उपलब्ध आहे 

जर तुम्ही Apple च्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 15 आणि 15 Plus खरेदी करत असाल तर कंपनी तुम्हाला एक ट्रेड-इन ऑफर देत आहे ज्या अंतर्गत तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात 2,000 ते 67,800 रुपयांची सूट मिळू शकते. 

तुम्ही Amazon वरून फोन विकत घेतल्यास, तुम्हाला iPhone 15 वर HDFC बँकेच्या कार्डवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे क्रोमावरील HDFC बँकेच्या कार्डवर बेस मॉडेलवर 5,000 रुपये आणि प्रो मॉडेल्सवर 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टवर 5,000 रुपयांची सूटही दिली जात आहे. बँक ऑफर्सशिवाय एक्सचेंज ऑफर्सचाही फायदा दिला जात आहे. तुम्ही तुमचे जुने डिव्हाईस देऊन नवीन मॉडेलवर सूट मिळवू शकता.

किंमत किती?

Apple ने iPhone 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले आहेत ज्यात iPhone 15, 15 plus, 15 Pro आणि 15 Pro Max यांचा समावेश आहे.

 आयफोन 15

– 128GB : 79,900 रुपये
– 256GB : 89,900 रुपये
– 512GB : 1,09,900 रुपये

आयफोन 15 प्लस

– 128GB : 89,900 रुपये
– 256GB : 99,900 रुपये
– 512GB : 1,19,900 रुपये

 आयफोन 15 प्रो

– 128GB : 1,34,900 रूपये
– 256GB : 1,44,900 रूपये
– 512GB : 1,64,900 रूपये
– 1TB : 1,84,900 रूपये

iPhone 15 Pro Max

– 256GB : 1,59,900 रूपये
– 512GB : 1,79,900 रूपये
– 1TB : 1,99,900 रूपये

या वेळी नवीन आयफोन सीरिज अनेक बदलांसह आली आहे. या सीरिजमध्ये बेस मॉडेलमध्ये 48MP कॅमेरा, यूएसबी टाइप-सी चार्जिंग, प्रो मॉडेल्समधील A17 चिपसेट, पेरिस्कोप लेन्स इत्यादींचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

iPhone 15 Series : महागड्या iPhone 15 ची मुंबईकरांमध्ये क्रेझ, खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी, आजपासून विक्री सुरु…

Related posts