Pandharpur Maharashtra Ujani Dam Chandrabhga River Cleaness By Varkari Students Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पंढरपूर : उजनीचे (Ujani Dam) पाणी पोहचण्याआधी शेकडो बाल वारकऱ्यांनी चंद्रभागेची (Chandrabhaga) स्वच्छता केली आहे. उजनीच्या धरणातून पंढरपूर (Pandharpur) , सांगोला , मंगळवेढा या शहरांसाठी भीमा नदीमधून (Bheema River) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर हे पाणी उजनी धरणापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा नरसिंहपूर येथे 33 तासानंतर पाणी पोहचले. या पाण्याचा पुढचा थांबा हा पंढपूर असणार आहे. दरम्यान हे पाणी चंद्रभागेत येण्याआधी चंद्रभागेची स्वच्छता शुक्रवारी सकाळी वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी केली. जेव्हा उजनीचे स्वच्छ पाणी चंद्रभागेमध्ये येईल तेव्हा नदीतील घाणीमुळे ते पाणी देखील प्रदुषित होईल. हीच बाब टाळण्यासाठी बाल वारकऱ्यांनी ही मोहीम हाती घेतली. 

शनिवार (22 सप्टेंबर) रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ही स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने नदीत सोडलेले जुने कपडे आणि घाणीचे ढीग गोळा करून ठिकठिकाणी एकत्र करण्यात आले. चंद्रभागेच्या पात्रामध्ये दशक्रिया विधी देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यामुळे या विधीवेळी लोक त्यांची जुनी वस्त्रे चंद्रभागेत सोडून देतात. तसेच विधीचे सर्व समान, कापलेले केस हे देखील चंद्रभागेमध्येच टाकले जातात. त्यामुळे चंद्रभागेची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र सध्या आहे. 

दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

तर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या लोकांना त्यांचे जुने कपडे आणि इतर गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी केली. दरम्यान चंद्रभागा अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. जगातील सर्व तीर्थे दुपारी चंद्रभागेत स्नानासाठी येतात, अशी मान्यता आहे. तर याच चंद्रभागेची सध्या दुरावस्था करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

उजनीचे पाणी चंद्रभागेमध्ये येणार

 सध्या पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या शहरात पाणीटंचाई सुरु असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.  अशावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने सोडवावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. सध्या भीमा नदी कोरडी असल्याने उजनी धरणातून पिण्यासाठी सोडलेले पाणी पंढरपूरला पोचायला वेळ लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या दरम्यान पाण्याचा शेतीसाठी पाणी उपसा होऊ नये म्हणून भीमा नदीकाठच्या दोन्ही काठावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे पाणी वेळेत पंढरपूर आणि सोलापूरपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा : 

Ujani Dam: उजनीतून दोन दिवसापूर्वी सोडलेल्या पाण्याचा वेग मंदावलाय, सोलापूरपर्यंत पाणी पोहोचायला लागणार तब्बल 10 दिवस

[ad_2]

Related posts