[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
वसई : ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना कंटाळून बापलेकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत जमिनीच्या वादातून झालेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बाप लेकाने राहत्या घरात एकाच रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऍडविन डिसोझा (वय 59) आणि कुणाल डिसोझा ( वय 27) असे आत्महत्या केलेल्या बापलेकाचे नाव आहे.
दोन्ही मृत वसईतील (Vasai) मूळ गावाचे राहणारे आहेत. दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी दोन वेगवेगळ्या सुसाइड नोट (Suicide Note) लिहिल्या आहेत. जमिनीच्या वादातून, रस्ता देण्यासाठी ब्लॅकमेलिंग आणि छळ होत असल्याने आम्ही आत्महत्या केली असल्याचे दोघांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी (Vasai Police) सांगितले आहे. सुसाइड नोटमध्ये वडिलांनी 8 जणांची तर मुलाने 4 जणांची नाव लिहिले आहेत. यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली आहे. तर इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.
अटक आरोपीमध्ये मनसेचा पदाधिकारी स्वप्नील डीकुन्हा आणि डॉ भूषण वर्मा यांचा समावेश आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. ब्लॅकमेलिंग कंटाळून बाप लेकाने एकदाच आत्महत्या केली असल्याने परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास वसई पोलीस करत आहेत.
वसईत प्रवाशी लॉजमध्ये ड्रायव्हरने चाकूने वार करत गायकाला संपवलं
चप्पल, बॅग ठेवण्यावरून वसईत प्रवाशी लॉज मध्ये एका 54 वर्षाच्या व्यक्तीची धारदार हत्याराने छातीत वार करून निर्घृणपणे हत्या (Vasai Crime) केली असल्याची धक्कादायक घटना 17 सप्टेंबर रोजी घडली. या बाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. राजेश शहा ( वय 54) असे आरोपीचे नाव आहे तर राधाकृष्ण व्यंकटरमन ( वय 58 ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही वसई रोड पश्चिम परिसरातील एका प्रवाशी लॉज मध्ये राहत होते. आरोपी राजेश शहा हा वाहन चालक असून मागच्या चार वर्षांपासून या लॉज मध्ये राहत होता. तर हत्या झालेले राधाकृष्ण हे गायक असून चार दिवसांपूर्वीच या लॉज मध्ये राहण्यासाठी आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
[ad_2]