Pune Crime News 27 Lakhs Extorted By A Prisoner Inside The Jail Forged Signatures In Money Order Register

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या (Yerwada Jail) तुरुंग प्रशासनाने कैद्यांच्या नावाने फसवणूक करून मनीऑर्डर रजिस्टरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी बलात्कार आरोपातील कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या खात्यांच्या ऑडिटमध्ये तपशील उघड झाल्यानंतर ही घटना समोर आली.

या प्रकरणी सचिन फुलसुंदर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 26 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे. 2021 ते 2023 दरम्यान कैद्याने अनेकवेळा जेल वर्कशॉपला भेट दिल्याचे उघड झाले आहे. त्याने मनीऑर्डर रजिस्टरमध्ये प्रवेश केला. ज्यामध्ये कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून मनीऑर्डरद्वारे मिळालेले पैसे रेकॉर्ड केले गेले आणि बनावट स्वाक्षरी वापरून खोट्या नोंदी केल्या. 

या प्रकरणात 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलसुंदरवर 2006 मध्ये बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. कारागृह प्रशासनाने आता कैद्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 420, 465, 467, 468, 471, 477-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

येरवडा कारागृहात काही दिवसांपूर्वी राडा

काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात हा राडा झाला होता. दगडफेक सुरु असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली होती. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या कैद्यांची नावं होती. 

जागा कमी अन् कैदी संख्या दुप्पट

येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या 2 हजार 526 इतकी आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या 6 हजार 484 कैदी ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ कारागृहात दुप्पट संख्येने कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.

इतर महत्वाची बातमी-

pune Crime News : आई-वडिल गावी गेले, ध्रुव फिरण्यासाठी रात्री एक वाजता बाहेर पडला अन् परतलाच नाही, नेमकं काय घडलं?

[ad_2]

Related posts