[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Namdev Shastri majha katta : काही लोकांनी अध्यात्माच्या नावाखाली विज्ञानाला बदमान केलं असल्याचे मत भगवानगडाचे महंत आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक नामदेवशास्त्री (Namdev Shastri) यांनी व्यक्त केलं. आज आपण विज्ञान हा शब्द वापरतो, पूर्वीच्या काळात अध्यात्म हा शब्द वापरला जात होता असे ते म्हणाले. ज्याला संत व्हायचंय त्यानं आधी वैज्ञानिक होणं ही ज्ञानेश्वर महाराजांची अट आहे. अध्यात्म ही विज्ञानाची जननी असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानं मराठी जीवंत ठेवल्याचे नामदेव शास्त्री म्हणाले. नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.
कोणत्याही संतांनी अंधश्रद्धा मानली नाही. सगळ्या संतानी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरीत 90 टक्के विज्ञान आहे.
100 टक्के लोक ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवतात पण समजणारे एक टक्का पण नाहीत. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं पण त्याचा अर्थ लावला जात नाही असे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरी हा पृथ्वीवरील एकमेव ग्रंथ असा ही आहे की, ज्यामध्ये पृथ्वीवरील सगळे विषय एकत्र आले आहेत असे नामदेवशास्त्री म्हणाले.
700 वर्षात ज्ञानेश्वरीला क्रॉस करणारा एकही माणूस जन्मला नाही
दोन चमत्कारामुळं ज्ञानेश्वर माऊलींचे नुकसान झाले आहे. भिंत चालवणे आणि रेडा बोलवणे या दोन प्रसंगामुळं शिकलेले लोकं ज्ञानेश्वरी वाचत नसल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. गेल्या 700 वर्षात ज्ञानेश्वरीला क्रॉस करणारा एकही माणूस जन्माला आला नाही, हादेखील एक चमत्कार असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरीत मानसशास्त्र आहे. आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय याची परीक्षा ज्ञानेश्वरीत घेऊ शकता असे नामदेवशास्त्री म्हणाले.
ज्ञानेश्वरीमध्ये जगातील सर्व प्रकारची माणसे
आयुष्यात जो खरं बोलू शकत नाही त्याने राजकारण करावं, असं ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. ज्ञानेश्वरीच्या 13 व्या अध्यायात ज्ञान आणि अज्ञानाच्या ओव्या आहेत. त्या वाचल्यावर आपल्याला ज्ञान आणि अज्ञानाबद्दल समजते असे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरीमध्ये जगातील सर्व प्रकारची माणसे आहेत. आपण नेमकं काय केलं पाहिजे याचे विवेचन ज्ञानेश्वरीत करण्यात आल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. ज्ञानेश्वरी विचार शिकवते. जो माणूस विचार शिकतो, त्याला त्याग कर हे सांगाव लागत नाही.
ज्ञानेश्वरीचा अर्थ कळावा म्हणून न्यायशास्त्र शिकलो
कोणत्याही संताचे चमत्कार हे तत्कालीन आहेत. आज त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग असल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले. वयाच्या 21 व्या वर्षी नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी पाठ होती. तिचा अर्थ कळावा म्हणून मी न्यायशास्त्र शिकल्याचे नामदेवशास्त्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
अहमदनगरच्या ‘क्रांती’ची कमाल! 100 दिवसातच लिओग्राफीत लिहिली ज्ञानेश्वरी… कसा केला विक्रम, काय आहे लिओग्राफी…
[ad_2]