टाळगाव चिखली येथे संत रोहिदास महाराज मंदिर लोकार्पण सोहळा, मुर्ती प्राणप्रतिष्ठाचे व ‘संत रोहिदास समाज भुषण ‘पुरस्काराचे आयोजन

चिखली: देहू-आळंदीच्या मध्यभागी असलेले व संत तुकाराम महाराज यांचे टाळ येथे असलेल्या ऐतिहासिक व संतांची भूमी म्हणून नावलौकीक मिळविणाऱ्या व संतपीठ असलेल्या श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथे संत रविदास (रोहिदास) महाराज यांची जयंती महोत्सव २०२३ व संत रोहिदास महाराज मंदिर लोकार्पण सोहळा व मुर्ती प्राणप्रतिष्ठाचे आयोजन व संत रोहिदास समाज भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.सदरचा कार्यक्रम संत रोहिदास प्रतिष्ठान ट्रस्ट चिखली, राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि ग्रामस्थ चिखली यांच्या वतीने गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी टाळगाव चिखली पाटीलनगर येथील संत शिरोमणी रविदास (रोहिदास) समाज मंदिर येथे होणार असल्याचे उत्सव समिती अध्यक्ष रामेश्वर पाचारे (युवक अध्यक्ष-रा.च. संघ पि.चि. शहर) यांनी मालमत भारत वृतपत्रकास बोलताय सांगितले आहे. अधिक माहिती देताना पाचारे यांनी सांगितले की, सदर कार्यक्रमास कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी समाजकल्यामंत्री बबनराव घोलप, सुखदेव महाराज वाघमारे -(राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटन) आमदार भोसरी विधानसभा महेशदादा लांडगे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष महादेव गायकवाड आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित असणार आहेत. असून तसेच कार्यक्रमाचे उदघाटन ज्ञानेश्वर कांबळे महासचिव राष्ट्रीय चर्मकार महासंघ, व बालाजी सोनटक्के सहाय्यक पोलिस आयुक्त औरंगाबाद शहर, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रम पुढील प्रमाण असून यामध्ये सकाळी ९ ते सकाळी १०. संत रोहिदास महाराज यांची आरती,, सकाळी १० ते ३ वधू-वर मेळावा. दुपारी ३ ते ५ पर्यत संत रोहिदास महाराज यांच्या पुर्णाकृती मुर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. तसेच सांयकाळी ५.३० ते ७ श्री सुखदेवजी महाराज यांचे प्रवचन आर्शिवाद सायं ७ ते रात्री ८ उपस्थित मान्यवर व्यक्तींचा जाहिर सत्कार तसेच रात्री ८ ते ९.३० महाप्रसादाचे वाटप होणार आहे. संत रोहिदास प्रतिष्ठाण ट्रस्ट चिखली, पूणे कार्यकारणी अध्यक्ष- बाबासाहेब पोळ, उपाध्यक्ष- रामेश्वर पाचारे, सचिव – राजहंस पाचंग्रे, कार्याध्यक्ष विनायक फुलपगर, दत्तात्रय- सोनवणे, किसन बोबडे उप-कार्याध्यक्ष-स्वप्निल थोरवे, धनराज पोहेकर, रोहिदास पोळ, महादू लहाने खजिनदार बाळू पोळ, अशोक शेळके, उपखजिनदार -सुरज पाखरे, दत्ता अस्वले, दत्ता हनवते, ऋषी गोरे, उप-सचिव- रखमाजी गोरे, तुकाराम कांबळे, किरण सोनवणे, विजु रोकडे, मुख्य प्रवक्ता-संतोष रोकडे, सल्लागार- दत्तात्रय कांबळे, प्रा. मारुती वाघमारे सदस्य- राजू रोकडे, विठ्ठल जाधव, बाबा खरात, अर्जून गायकवाड, नितिन गेंदळे, रामेश्वर दळवी, पांडुरंग सोनटक्के, मारुती सोनवणे, मधुकर कांबळे, विजय फुलपगर, दिगंबर हनवते, ज्ञानेश्वर काळे, सचिन पाखरे, बन्सी पोळ, अशोक बाभळकर, बंडु गोरे, रोहिदास वाघमारे, ईश्वर सोनवणे आदी संपर्क-९२२५८५७४८४/९३२५४०००५६/९२२६९३३६२४/८४५९३४०१०१

Related posts