[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आमदार अपात्रतेप्रकरणी आज दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर दुसरी सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत सुनावणी प्रक्रियेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. म्हणजेच एक प्रकारे या प्रकरणातील सुनावणीचे वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या सोमवारी सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. एका आठवड्यात दुसरी सुनावणी घ्या, असे निर्देशच कोर्टानं दिले होते. 11 मे रोजी आम्ही निर्णय दिला होता, आता ४ महिने उलटून गेले, मात्र या चार महिन्यांमध्ये कारवाई फारशी पुढे गेलेली नाही असे ताशेरे देखील कोर्टानं ओढले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुढील कारवाईची रुपरेषा स्पष्ट होते का ते पाहावं लागेल.</p>
<p> </p>
<p> </p>
[ad_2]