[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव देशात प्रसिद्ध आहे.(Pune Ganeshotsav 2023) या गणेशोत्सवात देशभरातून नागरिक देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी विदेशी नागरिकदेखील येत असतात. मात्र, यंदा पुण्याच्या या मिरवणुकीत इटलीमधील अॅना मारा या तरुणीने श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडामध्ये मर्दानी खेळ खेळत सर्वाचं मन जिंकलं. श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्यामधील व्हिडीओ सोशल मीडियावर पहिला होता. त्यानंतर येथील प्रशिक्षक यांच्याशी संवाद साधला आणि मी पुण्यात येऊन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले आणि आज प्रात्यक्षिक देखील सादर केलं असं ती म्हणाली.
दोघी पुण्यात आल्या, शिकल्या अन् लक्ष्मी रोड गाजवला…
काही दिवसांपूर्वी दोन युरोपीयन मुलीनी खास मर्दानी खेळाची प्रशिक्षण घेण्यासाठी युरोपातून पुणे गाठलं होतं. दोन दिवस पुण्यात मुक्काम केला आणि मर्दानी खेळ शिकून घेतले होते. बेली गांधरा आणि त्यांची मैत्रीण ॲना या दोघी युरोपीयन आहेत. बेली गंधार ही मुळची स्पेन देशाची आहे तर ॲना ही इटलीची आहे. दोघीही सुंदर नृत्य करतात. महाराष्ट्राची संस्कृती अनेकांना आकर्षित करणारी आहे. त्यामुळे या संस्कृतीचं आकर्षण या दोघींनाही आहे. शिवाजीराजे मर्दानी आखाडा या इस्टाग्राम पेजवर त्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा अशा साहसी खेळांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांना शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्याची इच्छा झाली. त्यानुसार त्या शिवकालीन मर्दानी खेळ शिकण्यासाठी थेट पुण्यात आल्या आणि दोन दिवस राहून शिकल्या होत्या.
अॅनालाही मर्दानी खेळाची भुरळ
महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेली शिवकालीन मर्दानी युध्द कला याची आवड निर्माण झाल्याने त्या कलेचे प्रशिक्षण घेण्यासाठी स्पेन आणि इटली येथील दोन तरुणी आखाडयामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत. गुरुवर्य वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी युध्द कलेचे प्रचार आणि प्रसाराचे जे कार्य करत आहोत ते कार्य आज खऱ्या अर्थाने साध्य होताना दिसत आहे. परदेशी पाहुण्यांना आपल्या संस्कृतीचे आकर्षण कायमचं राहिले आहे. पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील साहसी खेळांचे प्रशिक्षण घ्यायला या दोघी थेट पुण्यात आल्याने सर्वांचं अभिमान वाटतं आहे, असं शिवाजीराजे मर्दानी आखाड्याचे सदस्य सांगतात.
पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांचा जल्लोषात रस्त्यांवर दिसत आहे. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे. पुण्यात वैभवी विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
इतर महत्वाची बातमी-
Pune Ganeshotsav 2023 : अलका चौकात भव्य 100 फुटाची रांगोळी रेखाटायला सुरुवात; पाहा ड्रोन फोटो…
[ad_2]