Political Marathi News Delhi Cm Residence Controversy Arvind Kejriwal Reaction Attacks Pm Modi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Political News : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र केले आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या बांधकामातील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच गृह मंत्रालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान बांधण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तर पूनावाला यांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीच्या निर्णयाचे स्वागत केले.

केजरीवालांचे पंतप्रधानांना आव्हान
याप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपला फैलावर घेत पंतप्रधानांना (PM Narendra Modi) आव्हान दिले आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने आता मुख्यमंत्री निवासस्थानाची सीबीआय चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधान सध्या घाबरलेले आहेत आणि यावरून त्यांची अस्वस्थता दिसून येते.

 

 

पंतप्रधान राजीनामा देतील का? – केजरीवाल
केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांना इतर नेत्यांप्रमाणे आणि पक्षांप्रमाणेच मीही त्यांच्यासोबत सामील व्हावे अशी इच्छा आहे, परंतु त्यांनी हव्या तितक्या खोट्या चौकशी केल्या आणि हवे तितके खटले दाखल केले तरी मी त्यांच्यापुढे झुकणार नाही. मी त्यांना आव्हानही देतो – ज्याप्रमाणे मागील सर्व तपासात काहीही निष्पन्न झाले नाही, त्याचप्रमाणे या चौकशीतही काही निष्पन्न झाले नाही, तर खोटी चौकशी केल्याबद्दल ते राजीनामा देतील का? असा प्रश्नही यावेळी केजरीवालांनी पंतप्रधानांना केला आहे.

 

8 वर्षांत 33 हून अधिक प्रकरणे
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, त्यांच्याविरुद्धची चौकशी काही नवीन नाही, दिल्लीत ‘आप’चे सरकार आल्यापासून चौकशीनंतर तपास सुरू आहे. 8 वर्षांत 33 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. केजरीवालांनी शाळा बांधण्यात घोटाळा केल्याचे कधी-कधी बोलले जात होते, मात्र बस घोटाळा, दारू घोटाळा, रस्ते घोटाळा, पाणी घोटाळा, वीज घोटाळा या प्रकरणांच्या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. केजरीवाल पुढे म्हणाले, जगात माझी सर्वात जास्त चौकशी झाली असेल, पण कोणत्याही परिस्थितीत काहीही सापडले नाही आणि यातही काहीही सापडणार नाही. अरविंद केजरीवाल म्हणाले की, जेव्हा काही चूक नाही तेव्हा काय साध्य होणार आहे.

पंतप्रधान काहीच करत नाहीत
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांना चौथी पास राजा म्हणून संबोधले. चौथी पास राजाकडून आणखी काय अपेक्षा करता येईल, असे ते म्हणाले. ते फक्त चौकशी-चौकशीचा खेळ खेळत राहतात किंवा चोवीस तास भाषणे देत असतात. 

 

 

 

संबंधित बातम्या

आधी उपमुख्यमंत्री जेलमध्ये, आता टार्गेट मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या बांधकामाची CBI चौकशी करणार

 

 

 



[ad_2]

Related posts