[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारवर तुफान हल्ला चढवला. मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत. पण तिथे जाऊन ते नेमकं करणार काय आहेत? कोण भेटणार, कुठल्या कंपन्या भेटणार हे माहिती नाही. त्यामुळे हे दौरे म्हणजे सुट्ट्या समजायला लागले आहेत का, असा प्रश्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दोन दौरे रद्द केले, यह डर अच्छा है असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज्यात घटनाबाह्य सरकार बसलंय. 6 हजार कोटींचा रस्ते घोटाळा लोकायुक्तांकडे नेणार आहोत. स्ट्रीट फर्निचर घोटाळासुद्धा नेणार आहोत. मुख्यमंत्री फक्त टेंडर शोधत असतात. या सरकारमध्ये अनेकांना फॉरेन ट्रिप करायला आवडतात. हे सुट्टी समजायला लागेल आहेत. या दौऱ्यातून निघतं काय? मुख्यमंत्री यांचा दौरा जर्मनी लंडनला निघाला होता. जर्मनीला हाय वे बघायला जाणार होते. मी प्रश्न विचारला की तुम्ही येथे जाऊन करणार काय? डाओसमध्ये आम्ही काय केलं ते सगळं समोर आणलं होतं. मुख्यमंत्री नेमकं परदेशात जाऊन करणार काय? हा प्रश्न विचारला तर 30 मिनिटात दौरा रद्द मुख्यमंत्र्यांनी केला. यह डर अच्छा है, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
राहुल नार्वेकरांचाही दौरा रद्द
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) सुद्धा घाणाला (Ghana) जाणार आहेत.मात्र इकडे आमदार अपात्रताप्रकरण रखडवून तुम्ही संसदीय लोकशाहीची हत्या करताय. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला. 4 महिने झाले, तेव्हापासून निकाल पुढे ढकलला जात आहे. मी अध्यक्षांना विनंती केली, तुम्ही जाऊ नका राज्याची बदनामी करू नका. त्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
जनतेच्या पैशाचा अपव्यय करु नका
उद्योगमंत्री उदय सामंतांचा परदेश दौरा नेमका कशासाठी आहे हे त्यांनी सांगावं. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा, पण जनतेच्या पैशाचा अपव्यय करु नका. उद्योगमंत्री सामंतांचा हा तिसरा परदेश दौरा आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाताय, कोणाला भेटणार? कोणत्या कंपन्या येणार? काहीच स्पष्ट नाही. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम वेबसाईटवर वाघ नखांबद्दल माहिती घेतली .त्यात असं म्हटलंय की वाघ नखं शिवाजी महाराज यांनी वापरली की नाही? ही वाघ नखं शिवकालीन आहेत की शिवाजी महाराजांची आहेत? हे सांगा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. पाहणी दौरे काढायचे आहेत, तर खारघरमध्ये जी दुर्घटना घडली, तिकडे का जात नाहीत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
हे ही वाचा :
CM Shinde Foreign Tour : काल आदित्य ठाकरेंचा बोचरा वार, आज मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरा पुढे ढकलला!
[ad_2]