Horoscope Money Weekly : शुक्र, मंगळ गोचरमुळे ‘या’ राशी ठरणार भाग्यवान, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope Money Weekly (2 october to 8 october 2023) : ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा आर्थिकदृष्ट्या खूप भाग्यशाली सिद्ध होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या एकामागोमाग गोचरमुळे काही राशींसाठी हा आठवडा वरदान ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. (weekly money career horoscope 02 october to 8 october 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy and Sankashti Chaturthi 2023)

मेष (Aries Zodiac) 

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. या आठवड्यात आर्थिक बाबतीतही चांगली सुधारणा होणार असून आर्थिक लाभही होणार आहे. कुटुंबाच्या सहवासात तुम्ही आनंददायी वेळ घालवणार आहात. तुम्ही नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णय घेणार आहात. मात्र या आठवड्यातील प्रवास टाळलेलाच बरा होईल. 

शुभ दिवस : 2, 4

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत खूप बिझी असणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमच्या सततच्या प्रयत्नांना शेवटी यश मिळणार आहे. काही लोक या आठवड्यात खरेदीच्या मूडमध्ये असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.  आठवड्याच्या शेवटी काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. 

शुभ दिवस : 30, 2, 3 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगली बातमी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालविणार आहात. कुटुंबात नवीन सदस्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. या आठवड्यात प्रवासात काही बदल होणार आहेत. प्रवासातून सुखद योगायोग निर्माण होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ योगायोग घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटू शकतं. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला उदास आणि एकटेपणा वाटणार आहे.

शुभ दिवस : 3,4,5

कर्क (Cancer Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभदायक असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडे कमी पण यश नक्की मिळणार आहे. प्रवासातून आनंद मिळणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च वाढणार आहे. तुमच्या गुंतवणुकीकडे खास करुन लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या तरुण व्यक्तीबद्दल किंवा काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटू शकतं. 

शुभ दिवस: 3,5

सिंह (Leo Zodiac) 

या राशीचं भाग्य या आठवड्यात उजळणार आहे. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी शुभ योगायोग जुळून येणार आहे.  आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. या आठवड्यात केलेले प्रवास यशस्वी होणार आहे.  या आठवड्यात तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे भविष्यात आर्थिक प्रगती मिळणार आहे. कुटुंबातील काही बातम्या तुमच्या कानावर पडल्याने तुम्हाला वाईट वाटेल. 

शुभ दिवस: 3,5

कन्या (Virgo Zodiac) 

कामाच्या ठिकाणी शुभ योग घडणार असून तुमच्या प्रकल्पातून लाभ मिळणार आहे.  तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा प्रकल्पात कामासाठी बाहेर जावं लागणार आहे. तुम्हाला या आठवड्यात आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास योग होईल. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत निर्णय विचारपूर्वक घ्या. 

शुभ दिवस : 3, 4

तूळ (Libra Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत.  स्त्रियांच्या सहकार्याने जीवनात यश प्राप्त करणार आहात. सुख-समृद्धीचे योगायोग या आठवड्यात घडणार आहे. अशा स्थितीत विवेक ऐकून निर्णय घेणे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला मर्यादा जाणवणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास फायदाचं ठरेल. सप्ताहाच्या शेवटी जुन्या आठवणी ताज्या होतील आणि मन प्रसन्न होईल. 

शुभ दिवस: 3,6

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. या आठवड्यात संयम ठेवून पुढे गेल्यास चांगले परिणाम दिसणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकार बाजूला ठेवून काम केल्यास प्रकल्पात यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीतही भविष्याभिमुख राहणे तुमच्यासाठी शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकल्यास तुम्हाला फायदा होणार आहे. 

शुभ दिवस: 4,5

धनु (Sagittarius Zodiac)

या आठवड्यात नशीब धनु राशीच्या लोकांच्या बाजूने असणार आहे. आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल असा हा आठवडा असणार आहे. मात्र तरीही मन एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगल होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही खरेदीच्या मूडमध्ये असणार आहे. 

शुभ दिवस: 4,6

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सन्मान वाढणार आहे.  तुमच्या मतांचं कौतुक होणार आहे.  आर्थिक बाबतीत विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही सुरुवातीला कोणत्याही प्रवासाबाबत थोडे साशंक असाल मात्र त्यातून तुम्हाला यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमची अशा व्यक्तीला भेटणार आहात जी भविष्यात तुमच्या कामाला येणार आहे. 

शुभ दिवस: 5,6

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांना हा आठवड्यात आर्थिकदृष्ट्या अनुकुल असणार आहे. या आठवड्यातील सहल यशस्वी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आनंदी आणि समृद्धी मिळवून देणार आहे. हा आठवडा खर्चिक असणार आहे. आरोग्याशी संबंधित खर्च वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारणार आहे. तुमचं मन प्रसन्न असणार आहे. 

शुभ दिवस : 4,5,6

मीन (Pisces Zodiac)

आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे, त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. कुटुंबात सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे हा आठवडा. तुम्हाला या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळणार आहे. प्रवासातून तुम्हाला यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न आणि प्रफुल्लित असणार आहे. 

शुभ दिवस : 2,4,6

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts