Lord Jupiter will transit in Taurus The year 2024 will be lucky for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Guru Gochar In Vrishabha Rashi: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. देवांचा गुरू बृहस्पति सध्या स्वतःच्या राशीत मेष राशीत आहे. 2024 मध्ये तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरूच्या या गोचरमुळे कौटुंबिक, मानसिक, आर्थिक तसंच भौगोलिक परिस्थितीत बदल दिसून येतील. 

गुरु हे सौभाग्य, संतती आणि वैवाहिक सुखाचा कारण मानला जातो. गुरू 1 मे 2024 रोजी दुपारी 1:50 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु वर्षभर या राशीत राहून 14 मे 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. बृहस्पति वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात फरक पडणार आहे. दरम्यान यावेळी 3 राशी अशा आहेत, ज्यांना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया गुरुच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 

मेष रास (Mesh Zodiac)

गुरूचं गोचर या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळवून देणार आहे. या राशीच्या लोकांचे नशीब सुधारू शकते. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता. गुरुदेवांच्या कृपेने आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी चांगल्या घडणार आहेत. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.

वृषभ रास ( Vrishabha Zodiac)

गुरु गोचरमुळे या राशीच्या लोकांची विचारशक्ती आणि अभिमान वाढेल. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवनही चांगले राहील. तुम्हाला अधिक कौटुंबिक जबाबदाऱ्याही उचलाव्या लागतील. हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. यावेळी केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणार आहे. तुम्ही भाग्यवान होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.

कर्क रास ( Kark Zodiac)

या राशीमध्ये गुरु अकराव्या घरात असणार आहे. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. नोकरदारांसाठीही हे वर्ष चांगले आहे. पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी येऊ शकते. यासोबतच तुम्हाला व्यवसायात नफाही मिळू शकतो. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल. या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts