[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
महानगर गॅस लिमिटेडने महिन्याच्या सुरुवातीला सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करून मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे. घरगुती वापरासाठी आणि वाहनांसाठी नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी ही कपात करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन दर 2 ऑक्टोबरपासून लागू होतील.
सध्या मुंबईतील ग्राहकांना सीएनजीसाठी प्रतिकिलो ७६ रुपये मोजावे लागतात. पीएनजीसाठी ४७ रुपये द्यावे लागतील. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात २ रुपयांनी कपात केली आहे. तसेच पीएनजीच्या किमतीत 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 2 ऑक्टोबरपासून लागू होतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेक वाहनधारक आता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडतात. सीएनजी लांब पल्ल्यासाठी किफायतशीर आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या मते, मुंबईतील सीएनजी वापरकर्ते पेट्रोलवर ५० टक्के आणि डिझेलवर २० टक्के बचत करतात.
हेही वाचा
अंडरग्राऊंड मेट्रो-3ला मोबाइल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार
मध्य रेल्वेवर आता असणार हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे
[ad_2]