मुंबई : मोनोरेलच्या वेळेत बदल, पहा नवे टाईमटेबल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सध्या मुंबईतील चेंबूर ते सात रस्ता या देशातील एकमेव मोनोरेलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. २ ऑक्टोबरपासून मोनोरेलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याचा फायदा मोनो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून आता दर पंधरा मिनिटांनी मोनोरेल सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोनोरेलसाठी जादा वेळ वाट पाहावी लागणार नाही. पूर्वी मोनोरेलचा प्रवास दर 18 मिनिटांनी होता.

आता 2 ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले असून, त्यामुळे दर 15 मिनिटांनी एक फेरी करण्यात आली आहे.

गणपती उत्सवात मोनोरेलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणपती उत्सवादरम्यान मोनोरेलच्या प्रवासी संख्येत 20 टक्के वाढ झाली. लालबागचा राजा आणि इतर मोठी गणपती मंडळे याच परिसरात असल्याने गणपती उत्सवादरम्यान मोनोरेलला प्रवाशांची वर्दळ असते.

मोनोरेलवर सध्या स्मार्टकार्ड बंद आहेत. यापूर्वी दिलेले स्मार्ट कार्ड आतापर्यंत कायम ठेवण्यात आले असून नवीन स्मार्ट कार्डचे वितरण बंद करण्यात आले आहे. मोनोरेलचा कारभार एमएमआरडीएकडून हाताळला जात आहे. एमएमआरडीएने मोनोरेलची स्मार्ट कार्ड सेवा पुन्हा सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.


हेही वाचा

मुंबईत CNG-PNGच्या दरात कपात


MMRDA ठाण्यात मेट्रो लाइन 4 आणि 4A साठी डेपो बांधणार

[ad_2]

Related posts