शनिदेव 2025 पर्यंत ‘या’ राशींसाठी डोकेदुखी, तुमची रास यात आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म, न्याय आणि धर्माचं कारक मानला जातो. तो मानवला त्याच्या कर्मानुसार फळं देतो. त्यामुळे जाचकाला शनिदेवाची भीती वाटते. शनिदेव हा संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या या वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. अशात कर्मकार ग्रह 4 नोव्हेंबर आपली चाल बदलणार आहे. यामुळे शनिदेव पुढील दोन वर्ष म्हणजे 2025 पर्यंत अनेक राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (shani dev will remain in aquarius till the year 2025 these 5 zodiac signs suffering)

मिथुन (Gemini Zodiac)

शनीदेव मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. घरातील वरिष्ठ मंडळींच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. त्याशिवाय मुलांकडून वाईट बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यावर या दोन वर्षात दुःखाचा डोंगर कोसळण्याची भीती आहे. कार्यक्षेत्रात बदल घडणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी देखील शनिदेव वादळ घेऊन येणार आहे. तुमच्या राशीमध्ये अष्टम धैय्या असल्याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक जीवनात संकट कोसळणार आहे. हा काळ तुमच्यासाठी वाद आणि अडचणींचा ठरणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

या राशींसाठीदेखील शनिदेव अतिशय वाईट ठरणार आहे. वैवाहिक कार्यात मोठे अडथळे येणार आहेत. व्यवसायिकांसाठी हा शनिदेव कठीण काळ घेऊन येणार आहे. तुमचं आर्थिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्षकेंद्रीत करावे नाही तर अपयशाची दाट शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होईल. 

मकर (Capricorn Zodiac)

शनिदेव तुमच्या राशीत वादळ आणणार आहे. या काळात शनीची साडेसाती तुम्हाला अतिशय त्रासदायक ठरणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यावेळी तुम्हाला कुटुंबातही अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. 

मीन (Pisces Zodiac)

या राशींसाठी शनिदेव डोकेदुखी ठरणार आहे. मीन राशीच्या बाराव्या घरात शनि विराजमान असल्याने तुमच्या जीवनात मोठे बदल होणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक गुंतागुंत वाढणार आहे. तुमच्या आरोग्याकडे खास करुन डोळ्यांकडे लक्ष द्या. तुमचं जोडीदाराशी वाद होणार असून नात्यात तणाव निर्माण होईल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts