A devastating Pishach yog formed due to the combination of Saturn and Rahu sorrows will fall on these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pishach Yog: सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात हळूवार फिरणारा ग्रह मानला जातो. तर राहू नेहमी विरुद्ध दिशेने फिरतो. हे दोन ग्रह एकत्र आल्यावर एक महाविनाशकारी योग तयार होतो. शनी आणि राहूच्या एकत्रित येण्याने पिशाच योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रामध्ये, शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे मानले जातात. शनी देव हे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. राहूला ज्योतिषशास्त्रात पापी ग्रह मानलं गेलंय.

राहू आणि शनीची प्रकृती जवळपास सारखीच आहे. शनि आणि राहू यांच्या संयोगामुळे वेगवेगळे योग तयार होतात आणि त्यापैकी एक म्हणजे पिशाच योग. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत विनाशकारी मानला जातो. शनी सध्या कुंभ राशीत असून शतभिषा नक्षत्रात भ्रमण करतायत. हे नक्षत्र राहूचं असून 17 ऑक्टोबरपर्यंत शनी राहूच्या नक्षत्रात राहणार आहेत. शतभिषा नक्षत्रात असल्यामुळे शनि आणि राहूच्या संयोगामुळे अशुभ पिशाच योग तयार झालाय. या योगाच्या अशुभ आणि नकारात्मक प्रभावामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहूच्या संयोगाचा मोठा त्रास होणार आहे. कर्क राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. एखाद्या आजारामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. या राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कार्यालयात वरिष्ठांशी वाद होऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकते. 17 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी खूप कठीण असणार आहे. या काळात बहुतेक कामांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागेल.

कन्या रास

शनी आणि राहूच्या संयोगाने तयार झालेला पिशाच योग कन्या राशीच्या लोकांना खूप अडचणीत टाकणार असणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात 17 ऑक्टोबरपर्यंत समस्या येणार आहेत. कन्या राशीच्या लोकांना या काळात अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. तुमची नोकरी गमावण्याचा धोका देखील असू शकतो. या अशुभ संयोगाच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होऊ शकते. या काळात मोठं नुकसान सहन करावं लागू शकते. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळणार नाही. 

मीन रास

राहूच्या संयोगामुळे मीन राशीच्या लोकांवर प्रत्येक क्षेत्रात वाईट परिणाम दिसू शकतात. या राशीच्या लोकांना शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी पडू शकते. हा पिशाच योग खूप मानसिक त्रासदायक असणार आहे. अचानक आलेल्या काही समस्यांमुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. या काळात तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार येतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही त्रास सहन करावा लागू शकतो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts