[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : येरवडा मध्यवर्ती ( Yerwada Jail) कारागृहात कैद्यांच्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने सोमवारी पहाटे धारदार टिनच्या तुकड्याने हल्ला करून एका अंडरट्रायल कैद्याला गंभीर जखमी केलं आहे. येरवडा पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मधील बॅरेक क्रमांक 8 मधील मोकळ्या व्हरांड्यात ही घटना घडली आहे.
नुकताच न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात दाखल झालेला अंडरट्रायल कैदी रुषभ शेवाळे याच्यावर बारामती येथील रोहन अविदास माने या आणखी एका कैद्याने हल्ला केला. शेवाळे यांच्या गालावर आणि डोळ्यावर आणखी एक जखम झाली. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या कारागृहाच्या रक्षकांनी माने यांना जबरदस्तीने पकडलं आहे. माने यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 324 नुसार धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं येरवडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.
काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक
काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात हा राडा झाला होता. दगडफेक सुरु असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली होती. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावं होती.
जागा कमी अन् कैदींची संख्या दुप्पट
येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या 2 हजार 526 इतकी आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या 6 हजार 484 कैदी ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ कारागृहात दुप्पट संख्येने कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.
इतर महत्वाची बातमी-
Sasoon Hospital Drug Racket Pune : श्रीमंत आरोपींचे दुसरे घर म्हणजे ‘ससून रुग्णालय’? आजारांची कारणं देत आरोपींचा मुक्काम
[ad_2]