Pune Ex-Corporator Rape Case Shocking Ex Corporator Rape Threatened To Circulate Photographs Pune Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात जनतेच्या महिला लोकप्रतिनिधीदेखील (pune rape) असुरक्षित (Pune Crime News) असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सचिन मच्छिंद्र काकडे (वय 43) असं या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे. पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे चांगले संबंध होते. या सगळ्याचा फायदा घेते सचिन काकडे यांनी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. याच संबंधाची माहिती पतीला देईन, अशीदेखील धमकी दिली होती. अनेक प्रकारच्या धमक्या देत त्याने या महिला नगरसेविकेवर वारंवार बलात्कार केला. 2017 पासून हा सगळा प्रकार सुरु असल्याचं महिलेने सांगितलं आहे. नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळल्याचंदेखील समोर आलं आहे. 

तक्रारीत म्हटल्यानुसार, हा सगळ्या प्रकार केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी आरोपी सचिन काकडे तिच्या घरी आला होता. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. माझी पत्नी तुझ्यामुळे पळून गेल्याचंही त्यांने म्हटलं. या सगळ्या त्रासाला कंटाळून थेट महिला नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली. त्यांच्यावर झालेल्या या बलात्कारामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. महिला लोकप्रतिनिधींवरच असे अत्याचार होत असतील तर बाकी सामान्य महिलांच्या सुरक्षेचं काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पुण्यात जनतेच्या महिला लोकप्रतिनिधीदेखील असुरक्षित…

पुण्यात मागील काही वर्षांपासून बलात्काराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. रोज अनेक असे प्रकार समोर येतात. कधी कशाचं आमिष दाखवून तर कधी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हे प्रकार सुरु आहेत. त्यात सर्व वयातील मुली आणि महिलांचा समावेश आहे. अनेकदा बॅड टच आणि गुड टच या वर्गातून माहिती समोर येते तर अनेकदा पिडीत महिला स्वत: पोलिसांत जावून तक्रारी देतात. मात्र आता महिला लोकप्रतिनिधींवरच बलात्कार होत असेल, बाकी महिलांनी सुरक्षा अति प्रमाणात धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या नराधमांना शिक्षा कधी होणार?, हा प्रश्न कायम राहतो आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime news : नाना पेठेत दोन टोळी भिडल्या; एकाचा मृत्यू, आंदेकर टोळीतील 6 जणांना बेड्या

[ad_2]

Related posts