Ncp Supriya Sule On Ajit Pawar Devendra Fadanvis On Maharashtra Cm Election Politics Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: अजितदादा (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) ही संधी मला द्यावी अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. भाजपच्या आमदारांनी त्याग करावा आणि काँग्रेसमुक्त भारतासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं असा टोलाही त्यांनी लगावला. सुप्रिया सुळे जेजुरी (Jejuri)  येथे आल्या होत्या. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच असतील असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अजित पवारांना आम्ही सहा महिन्यांसाठी नव्हे तर पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. येत्या 2024 सालच्या निवडणुकीनंतर त्यांनी अजितदादांना पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवावं. त्यावेळी माझी एकच अट असेल, दादांना पहिला हार मी घालणार. 

Supriya Sule On BJP : भाजपच्या आमदारांचे आभार 

भाजपच्या सध्याच्या धोरणावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेस मुक्त भारत हे भाजपचे स्वप्न आहे, त्यामध्ये मोठा भाऊ म्हणून भाजपने त्याग केला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याला जर पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देणार असाल तर आनंदच आहे. ज्यांनी गेली 60 वर्षे भाजप हा पक्ष मोठा करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, संघर्ष केला त्या भाजपच्या सर्व आमदारांचे, कार्याकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते. संघर्ष तुम्ही केला पण ज्यावेळी चांदीच्या ताटात जेवण्याची संधी मिळाली त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी दिली याबद्दल त्यांचं आभार. 

भाजपच्या अतुल सावेंची मिश्किल टिप्पणी

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. अतुल सावे म्हणाले की, “अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याबाबत क्लिअर केलं नाही. त्यांना मुख्यमंत्री कधी करतील हे काही लिहिलं नाही. भविष्यात ते मुख्यमंत्री होऊ शकतात. भविष्य कधीही असू शकते, 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षानी”

ही बातमी वाचा: 

VIDEO : 2024 मध्ये पाच वर्षे दादाला मुख्यमंत्री करणार असाल तर मनापासून फडणवीसांचं स्वागत करते

“>

 

 

[ad_2]

Related posts